कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतात. अभिनेता इशा खट्टरचा असाच एक लूक समोर आला आहे. हा फोटो पाहून  इशान खट्टर असल्याचा कोणालाच विश्वास बसणार नाही. कानात बाली, डोळ्यात काजळ अशा लूकमध्ये तो दिसतोय. 

एरव्ही डॅशिंग लूकमध्ये दिसणारा इशानचा हा लूक त्याच्या आगामी सिनेमातला असावा असे तुम्हाला वाटेल मात्र इशानचा हा लूक त्यांच्या सिनेमासाठी नाही तर GQ मॅगेझिनसाठी त्यांनी हटके अंदाजात फोटोशूट केले आहे. खुद्द इशानेच त्याचा हा लूक शेअर केला असून त्यात कॅप्शनमध्ये फक्त GQ लिहीले आहे. त्यामुळे मॅगिझिनच्या कव्हर पेजवर इशानचा हा लूक पाहायला मिळणार आहे.  चाहत्यांसह सेलिब्रेटींनी देखील इशानच्या लूकला प्रचंड पसंती देत आहेत. 


इशान खट्टर हा शाहिद कपूरचा भाऊ आहे. त्यामुळे दोघेही एकत्र कधी रुपेरी पडद्यावर झळकणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी तो त्याचा भाऊ अभिनेता इशांत खट्टर याच्यासोबत युरोपमध्ये केलेल्या बाईकिंगमुळे चर्चेत आला होता. शाहिद त्याच्या भावाबद्दल खूप जास्त सेंसेटिव्ह असून तो त्याला कायम करिअरबाबत गाईड करत असतो. पण, सध्या मात्र, एक वेगळीच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे हे दोघे भाऊ आता एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण, शाहिदने एक अट ठेवली होती.

अलीकडेच एका शोमध्ये शाहिद कपूरला एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सांगितले की,‘मी इशानसोबत काम करायला कायम तयार आहे. मात्र, एका अटीवर ती म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट इंटरेस्टिंग असली पाहिजे. एकतर फॅमिली मेंबरसोबत काम करणं खूपच कठीण असतं, काम करण्याचं प्रेशर असतं.’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Difficult to recognize Ishaan khattar New Transformation look goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.