‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’मधील या चिमुकल्याने केले आहे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 06:30 AM2020-01-27T06:30:00+5:302020-01-27T06:30:02+5:30

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात रायबाच्या भूमिकेत असलेल्या छोट्या मुलाच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक होत आहे.

Did you know tanhaji the unsung warrior's raiba is played by arush nand | ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’मधील या चिमुकल्याने केले आहे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’मधील या चिमुकल्याने केले आहे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटात रायबाच्या भूमिकेत आरुष नंद हा बालकलाकार असून त्याने याआधी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने डिअर जिंदगी, परमाणू, फोबिया, नीरजा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला, यावरून याचा अंदाज यावा. हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट आहे. अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. काजोल, अजय देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि सैफ अली खान या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत छोट्या छोट्या भूमिकेत असलेले कलाकार देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. या चित्रपटात रायबाच्या भूमिकेत असलेल्या छोट्या मुलाच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक होत आहे. त्याने त्याच्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकले आहे. 

या चित्रपटात रायबाच्या भूमिकेत आरुष नंद हा बालकलाकार असून त्याने याआधी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने डिअर जिंदगी, परमाणू, फोबिया, नीरजा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आरुषने बॉलिवूडच नव्हे तर जाहिरात जगतात देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक प्रसिद्ध ब्रँडसाठी त्याने मॉडलिंग केले आहे. 


Web Title: Did you know tanhaji the unsung warrior's raiba is played by arush nand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.