ठळक मुद्देमी अजिबात पार्टी करत नाही, पण माझे मित्र मला पार्टीसाठी गाणी लिहिण्यास मदत करतात. माझ्या मित्रांनी आणि परिचितांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून मी प्रेरणा  घेतो. या पोस्ट्सचा उपयोग मी अभ्यासपूर्ण संशोधन करून गाणी लिहिण्यासाठी करतो.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात रॅपर बादशाह आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात त्यांच्या ‘खानदानी शफाखाना’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार असून कपिलच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती करणार आहेत. 

पार्टीसाठी खास रॅप साँग बनवण्यात पारंगत असलेला बादशहा स्वतः पार्टी करत नाही ही गोष्ट द कपिल शर्मा शो मध्ये विनोदवीर कपिल शर्मा बरोबर थट्टामस्करी करताना त्याने सांगितली. या कार्यक्रमात बादशहा आणि सोनाक्षी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील मनोरंजक किस्से प्रेक्षकांना सांगताना दिसणार आहेत.
 


बादशाह स्वतः कोणत्याही पार्टीत जात नसला तरी ‘मर्सी’, ‘कर गई चुल’, ‘द हम्मा सॉँग’ अशी अनेक पार्टींमध्ये गायली जाणारी लोकप्रिय गाणी लिहिण्यासाठी त्याला प्रेरणा कुठून मिळते हे द कपिल शर्मा शो मध्ये स्पष्ट करताना दिसणार आहे. पार्टी म्हटली की, त्यात बादशाहची गाणी हमखास असतातच, त्याच्या धमाकेदार गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकल्याशिवाय राहू शकत नाही. तथापि, जेव्हा कपिल शर्माने बादशाहला त्याच्या पार्टी मूडसंबंधी विचारले तेव्हा रॅपरने स्पष्ट केले, “मी अजिबात पार्टी करत नाही, पण माझे मित्र मला पार्टीसाठी गाणी लिहिण्यास मदत करतात. माझ्या मित्रांनी आणि परिचितांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून मी प्रेरणा  घेतो. या पोस्ट्सचा उपयोग मी अभ्यासपूर्ण संशोधन करून गाणी लिहिण्यासाठी करतो.” 


 
द कपिल शर्मा शो मध्ये रॅपर त्याला ‘बादशाह’ हा किताब कसा मिळाला याचा खुलासा करताना देखील दिसणार आहे. तसेच ‘दबंग’ या सोनाक्षीच्या पहिल्या चित्रपटासाठी सलमान खानने तिच्याशी कसा संपर्क साधला याविषयी सोनाक्षी सिन्हा खुलासा करणार आहे.

Web Title: Did you know rapper Badshah doesn’t do party at all? – Revealed on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.