Did you know mallika sherawat was married before entering into bollywood | सिनेमात येण्याआधी मल्लिका शेरावतचे झाले होतं लग्न, इमरान हाश्मीसोबतच्या बोल्ड सीन्समुळे आली होती चर्चेत

सिनेमात येण्याआधी मल्लिका शेरावतचे झाले होतं लग्न, इमरान हाश्मीसोबतच्या बोल्ड सीन्समुळे आली होती चर्चेत

मल्लिका शेरावतने २००३ साली आलेल्या 'ख्वाहिश'  सिनेमातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. पहिल्या सिनेमात मल्लिकाने १७ किसिंग सीन्स दिल्यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र, 'मर्डर' सिनेमातून मल्लिकाला प्रसिद्धी मिळाली. सिनेमाची गाणी चांगलीच हिट तर ठरलीच, पण इम्रानसोबतच्या मल्लिकाची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मल्लिका सिनेमात एंट्री करण्यापूर्वीच विवाहित होती. मल्लिका शेरावतचे खरे नाव रिमा लांबा आहे. सिनेमात झळकण्यापूर्वी ती एअरहोस्टेस म्हणून काम करायची. तिथेच तिची पायलट असलेल्या करण सिंह गिलसोबत ओळख झाली. त्यांची चांगली मैत्री झाली, दोघेही एकत्र वेळ घालवत असे. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले आणि दोघांनीही कुटुंबियांच्या संमतीने लग्न करत संसार थाटला. सर्वकाही सुरळीत सुरु असताना असे काही घडले की, मल्लिकाने थेट पतीपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेत वेगळी झाली.

एअर होस्टेस असलेली मल्लिकालाही इतर मुलीप्रमाणे ग्लॅमरस इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र सिनेमात काम करण्यास कदाचित तिच्या पतीचा विरोध असावा. म्हणूनच चंदेरी दुनियेत कोणत्याही प्रकारची कामाची सुरूवात नसतानाही तिने करणला घटस्फोट दिला आणि मॉडेलिंगला सुरूवात केली. अनेक व्यावसायिक जाहिरातीत झळकण्याची संधीही तिला मिळाली. त्यानंतर 'मर्डर', 'ख्वाहिश', 'अनफेथफुल','हिस्स', 'डर्टी पॉलिटिक्स', 'तेज', 'वेलकम' तसेच हॉलिवूड, बॉलिवूडच्या सिनेमात झळकत तिने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did you know mallika sherawat was married before entering into bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.