बॉलिवूडमध्ये असे बरेच कपल्स आहेत. ज्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि ते विभक्त झाले. या कपल्सपैकी एक कपल म्हणजे अभिनेता संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा. संजय दत्त आणि रिचा शर्माचे नाते तुटण्यामागे माधुरी दीक्षित कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. 

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल सर्वांनाच माहित आहे. साजन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते, ज्यामुळे संजयच्या विवाहित आयुष्यात समस्या आल्या होत्या. संजय दत्त त्यावेळी विवाहित होता, त्याला रिचा पासून एक मुलगी आहे. एकीकडे जिथे रिचा आपल्या कॅन्सरच्या उपचारासाठी युएसला गेले होते. तर दुसरीकडे संजय आणि माधुरीचे किस्से वायरल होत होते. अशात ही बातमी रिचाला कळली तेव्हा रिचा कोलमडून गेली होती.


संजय दत्त आणि माधुरी दीक्षितबद्दल बोलताना रिचाने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझी इच्छा आहे की संजय माझ्या जीवनात परत यावा. आम्ही दोघे बराच काळ एकमेकांपासून दूर राहत आहोत, त्यामुळे आमच्या नात्यात दुरावा आला आहे. मी संजयला विचारले होते की तुला डिवॉर्स हवा आहे का?, त्यावर त्याने स्पष्ट नकार दिला. मलादेखील त्याला डिवॉर्स द्यायचा नव्हता. फक्त मला माझे लाइफ परत हवे आहे. जे काही झाले ते विसरायला मी तयार आहे. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो फक्त माझ्या जीवनात परत यावा.


मात्र रिचाच्या या गोष्टींचा संजय दत्तवर काहीच फरक पडला नाही.त्याने फक्त रिचा शर्मासोबत घटस्फोट घेतला नाही तर लेकीला पण एकटे सोडले. यावर रिचा शर्माची बहिण एना शर्मा म्हणाली होती की, माधुरीमध्ये जराही माणूसकी नाही. माधुरीला कोणीतरी दुसरा मिळू शकतो. मात्र तिने एका अशा पुरूषाची निवड केली जो विवाहित होता. त्यामुळे फक्त माझ्या बहिणीचे घरच नाही तुटले तर संपूर्णपणे ती एकटी जीवन व्यतित करते आहे.


भले आज माधुरी आणि संजय दत्तमध्ये कोणते नाते नाही मात्र एकवेळी जगाच्या नजरेत ते एक कपल्स होते. या नात्यामुळे संजय दत्त आणि त्याची पत्नी रिचाचा घटस्फोट झाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did Sanjay Dutt date Madhuri Dixit? Here's what Dutt's ex-wife Richa Sharma's sister has to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.