सलमान खानच्या 'रेस 3'ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकुळ घातला होता. यात बॉबी देओल अ‍ॅक्शन करताना दिसला होता. मात्र तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का 'रेस 3' साठी बॉबी देओल पहिली चॉईस नव्हता.  


आजतकच्या रिपोर्टनुसार,  सिद्धार्थ मल्होत्राला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्याच्या डेट नसल्याने त्याने हा सिनेमा साईन केला नाही.  रिपोर्टनुसार सिद्धार्थ म्हणाला, आमच्यामध्ये क्रिएटिव्हला घेऊन कोणतेच मतभेद नव्हते. त्यावेळी माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे ते 'रेस 3' करु शकलो नाही. मला नेहमीच रमेश तौरानी आणि सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा होती. मला आशा आहे की लवकरच आम्ही एकत्र काम करु.''        
                                                                                                                                                                                                                                                                                                             
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सिद्धार्थ सध्या 'मरजावांचा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सिद्धार्थ, रितेश, तारा यांच्याव्यतिरिक्त रकुल प्रीत सिंगदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अ‍ॅक्शनचा तडका असलेला या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरीनं केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच रितेश बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख यांनी यापूर्वी रोमँटिक स्टोरी एक व्हिलनमध्ये एकत्र काम केलं आहे. मरजावां चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रितेशची एन्ट्री एक व्हिलनमधील गाणं तेरी गलियाच्या म्युझिकनं होतं. सिद्धार्थ व ताराच्या लव्हस्टोरीमध्ये युटर्न रितेशच्या एन्ट्रीमुळे होतो. येत्या 15 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Did bobby deol replaced sidharth malhotra in salman khan race 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.