क्रिकेटर युजवेंद्र चहलची फियॉन्से धनश्री वर्माने आपल्या डान्सने धुमाकूळ घातला आहे. सध्या ती तिच्या डान्समुळे खूप चर्चेत आली आहे. ती नेहमी आपल्या डान्सने चाहत्यांसोबत संपर्कात राहते. नुकताच तिने वेडिंग स्पेशल डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ युट्यूबवर धुमाकूळ घालतो आहे.

 

या व्हिडीओत धनश्री रणबीर कपूरसोबतच्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. तिचा डान्स व्हिडीओ पाहून युजवेंद्र चहलने दमदार रिअ‍ॅक्शन दिली आहे.

युजवेंद्र चहलची फियॉन्से धनश्री वर्मा व्हिडीओत रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा चित्रपट ऐ दिल है मुश्कीलमधील क्युटीपाई गाण्यावर थिरकताना दिसते आहे. या गाण्यावरील तिच्या डान्स स्टेपसोबत तिची एनर्जी पाहण्यासारखी आहे. खरेच तिचा डान्स खूप दमदार झाला आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे

 या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तिच्या या व्हिडीओवर क्रिकेटर युजवेंद्र चहलनेदेखील कमेंट केली आहे. त्याने हार्ट शेप इमोजी आणि क्लॅपिंग इमोजी शेअर करून रिअ‍ॅक्शन दिली आहे.

युजवेंद्रच्या होणाऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती डॉक्टर, कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रलाही डान्स शिकवतानाचे व्हिडीओ आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhanshree Verma Thirkali Ranbir Kapoor's song, fiancee Yujvendra Chahal's reaction after watching the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.