बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित नुकतीच 53 वर्षांची झाली आहे. बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे माधुरी दीक्षितने दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे. सध्या ती फार कमी सिनेमांमध्ये दिसते. सध्या ती लॉकडाउनमध्ये आपल्या घरात वेळ व्यतित करत आहे. तिच्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार माधुरी दीक्षित जवळपास 250 कोटींची मालकीण आहे. फक्त देशातच नाही तर परदेशातही माधुरीची प्रॉपर्टी आहे.

माधुरी दीक्षित एका चित्रपटासाठी 50 लाख ते एक कोटी रुपये मानधन घेते. सध्या ती फार कमी सिनेमांमध्ये काम करते आहे. तरीदेखील एका सिनेमासाठी ती चार ते पाच कोटी रुपये घेते. रिपोर्ट्सनुसार, तिची मुंबई व अमेरिका या दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तसेच तिच्याकडे रेसिडेन्शिएल अपार्टमेंट व कमर्शिएल प्रॉपर्टी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार काही वर्षांपूर्वी त्यांनी फ्लोरिडामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तसेच मियामीमध्ये मॉलदेखील विकत घेतला आहे. तसेच तिच्याकडे ऑडी, रॉल्स रॉयस व स्कोडा रॅपिड सारख्या लक्झरी गाड्यादेखील आहेत.

या व्यतिरिक्त रिएलिटी शोचे परीक्षण करण्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय एंडोर्समेंटचे वेगळे चार्जेस घेते. चित्रपटांशिवाय जाहिरातीतूनही मानधन मिळते.  

माधुरी व तिचा नवरा मागील पाच वर्षांपासून युरेका फोर्ब्सचे अॅम्बेसिडर आहेत आणि त्यासाठी ते 100 कोटी रुपये चार्ज घेतात. 

माधुरीने 1984 साली अबोध चित्रपटातून करियरची सुरूवात केली होती. पहिलाच चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर 1988 साली रिलीज झालेल्या तेजाब सिनेमातून ती लोकप्रिय झाली. त्यातील एक, दो, तीन.. हे गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. याशिवाय माधुरीने बऱ्याच सिनेमात काम केले आहे. मराठीतही बकेट लिस्ट चित्रपटात ती झळकली होती.

Web Title: Dhakdhak Girl Madhuri Dixit is the owner of so many crores TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.