वयाची चाळीशी उलटलेली असतानाही आजही तितकीच ग्लॅमरस दिसते मलायका अरोरा, फोटोंनी लावले चाहत्यांना वेड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:13 PM2021-09-17T19:13:16+5:302021-09-17T19:13:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ४७ वर्षांची असली तरी तिने फिगर आणि पर्सनॅलिटी चांगलीच मेन्टेन केली आहे.

Despite being in her forties, Malaika Arora looks just as glamorous today, her photos are crazy. | वयाची चाळीशी उलटलेली असतानाही आजही तितकीच ग्लॅमरस दिसते मलायका अरोरा, फोटोंनी लावले चाहत्यांना वेड

वयाची चाळीशी उलटलेली असतानाही आजही तितकीच ग्लॅमरस दिसते मलायका अरोरा, फोटोंनी लावले चाहत्यांना वेड

Next

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ४७ वर्षांची असली तरी तिने फिगर आणि पर्सनॅलिटी चांगलीच मेन्टेन केली आहे. ती तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे सतत लाइमलाइटमध्ये येत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्याला लोकांची खूप पसंती मिळते आहे.

मलायका अरोराने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाचे आउटफिट घातले आहे. यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना खूपच पसंती मिळताना दिसते आहे. या फोटोत ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. 


मलायका अरोरा चांगली डान्सर, मॉडेल आणि बिझनेस वुमनसोबत फिटनेस फ्रिकदेखील आहे. ती तिच्या फिटनेससोबत अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते.

अर्जुन मलायकापेक्षा वयाने १२ वर्षे लहान आहे. मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांचे नातं आता त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारले आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे नाते जगजाहीर केले होते. 


एका मुलाखतीत अर्जुन मलायकाबद्दल भरभरून बोलला. त्याने सांगितले की, मलायका स्वतःच्या हिमतीवर आदरयुक्त आयुष्य जगतेय, ही तिची गोष्ट मला खूप भावते. वयाच्या विसाव्या वर्षी तिने काम सुरू केले आणि आयुष्यात पुढे जात सन्मान मिळवला. तिची हीच गोष्ट मला खूप आवडते.


अर्जुन कपूर नुकताच भूत पुलिसमध्ये झळकला आहे. तर मलायका अरोरा लवकरच इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

Web Title: Despite being in her forties, Malaika Arora looks just as glamorous today, her photos are crazy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app