करिअरमध्ये फार काही सुरळीत नसले तर अभिनेत्री लग्न करत संसारात रमतात. बॉलिवूडपासून दूर जात त्यांचे आलिशान आयुष्य एन्जॉय करत असतात. मात्र या सगळ्यांनाही अपवाद ठरते अभिनेत्री दिव्या खोसला कुमार. आज दिव्याने यशस्वी निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. करिअरच्या सुरूवातीला अभिनयातही तिने आपले नशीब आजमवले. मात्र निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनच ती  आज लोकप्रिय बनली आहे.


दिव्याचा जन्म 20 नोव्हेंबर 1981 रोजी दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सुरुवातीपासूनच चित्रपटांबद्दलची आवड होती, त्यामुळे दिव्या इंडस्ट्रीमधील करिअरचा शोध घेण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली. 2004 मध्ये तिने ‘लव्ह टुडे’ या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले.नंतर ती फाल्गुनी पाठक यांच्या 'अय्यो रामा' या गाण्यातही दिसली.

 

त्यानंतर ती अक्षय कुमार आणि बॉबी देओलच्या 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो'  चित्रपटात दिसली होती.असं म्हणतात की या चित्रपटादरम्यान दिव्याने टी-मालिकेचा मालक भूषण कुमार याची भेट झाली.पहिल्याच भेटीत भूषण कुमार दिव्यावर फिदा झाले होते. हळुहळु दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. भूषण हा गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी- सिरीजचा मालक अशी त्याची ओळख.

13 फ्रेबुवारी साल 2005 साली  वैष्णो देवी, कटरा येथे दोघांनी लग्न केले. या दाम्पत्याला एक एक मुलगाही आहे, ज्याचे नाव त्यांनी रुहान ठेवले आहे.लग्नानंतरही दिव्या तिच्या कामात बिझी असते. लग्न केले म्हणून काम करणे सोडले नाही. दिवसेंदिवस आणखीन काही नविन करता येईला का? याच उद्देशाने तिने  काही कोर्सही पूर्ण केले. नेहमीच दिव्या नाविन्याच्या शोधात असते. स्वतःला अपडेट करत राहणे खूप गरजेचे आहे असे दिव्या मानते. दिव्याने  ‘यारियाँ’सिनेमातून  दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शन करण्यास सुरवात केली होती. 

दिव्याचा पती भूषण कुमार अब्जाधीश आहेत आणि स्वत: लाखो कोटींची कमाई करतो. पण  अब्जाधीशची पत्नी असूनही दिव्याने कधीच श्रीमंतीचा आव आणला नाही. तिचे राहणीमान असो किंवा इतर गोष्टी कधीच त्यात तिने बडेजावपणा केला नाही.

राहणीमान, वागणं यातील साधेपणा आजही  कायम आहे. सामान्य आयुष्य जगणेच ती जास्त पसंत करते.  दिखाव्यावर न जात  दिव्याला साधेपणाने जगायला आवडते. कोट्यावधी लोक तिचे सौंदर्य आणि साधेपणामुळेच तिच्यावर फिदा असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Despite being a billionaire, actress Divya Khosla Kumar oves to live with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.