delhi violence swara bhaskar trolled brutally for making a comment and questioning on supreme court of india-ram | Delhi Violence: स्वरा भास्करला अटक करा...! व्हिडीओ पाहून चढला युजर्सचा पारा!!

Delhi Violence: स्वरा भास्करला अटक करा...! व्हिडीओ पाहून चढला युजर्सचा पारा!!

सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात  २७ हून अधिक जणांचा  मृत्यू झाला. अनेकांची घरे उद्ध्वस्त झालीत. दिल्लीत धुमसत असताना सोशल मीडियावर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडही स्टार्सही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. याचदरम्यान बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि यानंतर सोशल मीडिया युजर्सनी स्वराला अटक करण्याची जोरदार मागणी लावून धरली. क्षणात #ArrestSwaraBhashkar हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी तिला दिल्लीतील हिंसाचारासाठी जबाबदार धरले.

काय आहे व्हिडीओत
व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्वरा भास्कर वेगवेगळ्या मुद्यांवर मत मांडताना दिसतेय. ‘आपण एका अशा देशात राहतो, जिथे सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयात एकीकडे बाबरी मशीद पाडणे गैर असल्याचे म्हणते आणि दुसरीकडे त्याच निर्णयात  बाबरी पाडणा-यांना रिवार्ड देते’, असे स्वरा या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

ट्रोलर्स म्हणतात,


या व्हिडीओनंतर लोकांनी स्वराला जोरदार लक्ष्य केले. हिच्या भाषणामुळे दिल्ली पेटतेय, असे एका युजरने स्वराला लक्ष्य करताना लिहिले. ‘या भडकाऊ भाषणांसाठी स्वराला अटक व्हायला हवी. ती त्याच लायकीची आहे,’ असे अन्य एका युजरने लिहिले आहे. ‘दिल्लीत 27 लोकांचा मृत्यू झाला. तुला जखमींचा शाप लागेल,’ असे एका युजरने लिहिले आहे. एकीकडे सोशल मीडिया युजर्स स्वराला ट्रोल करत आहेत तर दुसरीकडे स्वराने ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले आहे. ‘टट्टी अंकल - मेरी चिंता मत कर! ये सारी मौतें तुम्हारी ideology के टटूओं की देन है! एक दिन ये आग हम सब के घर आएगी और ये तुम लोगों की बदौलत होगी! अब जाओ और टट्टी खाओ !’, असे एका ट्रोलरला उत्तर देताना तिने लिहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: delhi violence swara bhaskar trolled brutally for making a comment and questioning on supreme court of india-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.