Deepika padukone drugs case first tweet after probe prabhas birthday | दीपिका पादुकोणने ड्रग्स प्रकरणातील चौकशीनंतर सोशल मीडियावर लिहिला पहिला मेसेज

दीपिका पादुकोणने ड्रग्स प्रकरणातील चौकशीनंतर सोशल मीडियावर लिहिला पहिला मेसेज

दीपिका पादुकोणसाठी 2020 हे वर्ष कठीण गेले आहे. आधी कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे तिचा मेग बजेट सिनेमा '83' पोस्टपोन झाला आणि नंतर ती ड्रग्जच्या प्रकरणात वाईट पद्धतीने अडकली.गेल्या महिन्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली.

NCBच्या चौकशीनंतर दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर केला पहिला मेसेज
लॉकडाऊनमध्ये दीपिका सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह होती पण ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर ती ना इन्स्टाग्रामवर ना ट्विटरवर कुठेच सक्रिय दिसली नाही. एनसीबीच्या चौकशीनंतर ती एकही पोस्ट सोशल मीडियावर केली नव्हती. जवळपास एक महिन्यानंतर दीपिका पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. तिने आपला मित्र आणि अभिनेता प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. आपल्या इन्स्टा स्टोरीवर प्रभासचा फोटो शेअर केला आहे. प्रिय प्रभास, तू नेहमी आनंदी आणि निरोगी रहा, मी आशा करतो की, हे वर्ष आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरले. 


प्रभास आणि दीपिकाची जोडी एक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण स्वतः दीपिकाने काही महिन्यांपूर्वीच चित्रपटाची घोषणा केली होती.ती म्हणाली होती की, साऊथ सुपरस्टारबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करते आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika padukone drugs case first tweet after probe prabhas birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.