deepika padukone chhapaak and ajay devgn tanhaji day 10 box office collection | Tanhaji Movie : 10 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चे धुमशान, कमावले इतके कोटी
Tanhaji Movie : 10 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चे धुमशान, कमावले इतके कोटी

ठळक मुद्दे‘तान्हाजी’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकला असून काजोलने तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.  

अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ आणि दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ रिलीज होऊन दहा दिवस झालेत. या दहा दिवसांत दीपिकाच्या ‘छपाक’ला धोबीपछाड देत, अजयच्या ‘तान्हाजी’ने बराच मोठा पल्ला गाठल्याचे दिसतेय.  200 कोटी क्लबकडे ‘तान्हाजी’ची वाटचाल सुरु आहे. 
  पहिल्या सहा दिवसांतच ‘तान्हाजी’ने 100 कोटींचा गल्ला जमवला. अद्यापही या चित्रपटाची घोडदौड अद्यापही सुरुच आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहिल्यानंतर त्याच्या स्पर्धेत अन्य कोणताही चित्रपट नसल्याचे दिसून येत आहे.  नवव्या दिवशी या चित्रपटाने 16.36 कोटी रुपयांची कमाई केली तर दहाव्या दिवशी 22.12 कोटींचा बिझनेस केला. आत्तापर्यंत  आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 167.45 कोटी रुपये झाली आहे. कमाईचा वेग असाच राहिला तर हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करेल असे दिसतेय.
‘तान्हाजी’सोबतच रिलीज झालेल्या ‘छपाक’कडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे अनेक चित्रपटगृहांतून हा चित्रपट उतरवण्यात आला आहे. रिलीजच्या दुस-या शनिवारी या चित्रपटाने केवळ 1.10 कोटींची कमाई केली. रविवारचे अधिकृत आकडे अद्याप आलेले नसले तरी या चित्रपटाची एकूण कमाई 32 कोटींच्या घरात आहे.
‘तान्हाजी’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकला असून काजोलने तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.  अजिंक्य देव,  शरद केळकर, शशांक शेंडे, देवदत्त नागे,जगन्नाथ निवंगुणे,प्रसन्न केतकर, भाग्यश्री  न्हालवे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

English summary :
Tanhaji Movie Box Office Collection Day 10 : Ajay devgan starer Tanhaji movie create a great box office collection from first day of release. For more news around tanhaji movie visit Lokmat.com.

Web Title: deepika padukone chhapaak and ajay devgn tanhaji day 10 box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.