De de pyaar de first look ajay devgn tabu starter film | अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचे पोस्टर आऊट

अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचे पोस्टर आऊट

ठळक मुद्देअजयच्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाला आहेअजय देवगण तब्बल ८ वर्षांनंतर रोमॅन्टिक कॉमेडीत हात आजमावणार आहे

अजय देवगणचा आगामी सिनेमा दे दे प्यार दे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजय कॉमेडी अंदाजात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अजय देवगणच्या 'टोटल धमाल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा आकडा पार केला.
 नुकतेच अजयच्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाला आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगण, रकुलप्रीत आणि तब्बूसोबत कॉमेडी अंदाजात दिसतोय. ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. अजय देवगण तब्बल ८ वर्षांनंतर  रोमॅन्टिक कॉमेडीत हात आजमावणार आहे. आठ वर्षांपूर्वी ‘दिल तो बच्चा है जी’ या रोमॅन्टिक कॉमेडीपटात अजय दिसला होता. 


अजय देवगणचा हा सिनेमा 17 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शक लव रंजन यांच्या प्रोडक्शन अंतर्गत होतेय तर भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अनुराग गर्ग याचे सहाय्यक निर्माते आहे. या सिनेमाला अकीव अली दिग्दर्शित करतोय.  याशिवाय अजय  ‘भूज- द प्राईड आॅफ इंडिया’सिनेमात हवाईदलाचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.१९७१ च्या भारत-पाक युद्धदरम्यान भूज विमान तळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. अभिषेक दुधई द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट गिन्नी खानूजा,वजीर सिंह, भूषण कुमार यांची निर्मिती आहे.

Web Title: De de pyaar de first look ajay devgn tabu starter film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.