ठळक मुद्देहा चित्रपट प्रदर्शित होऊन आता दहा दिवस झाले असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ७५ कोटीहून अधिक गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे. 

दे दे प्यार दे या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट थोडासा हटके आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे या चित्रपटाला पहिल्या दिवसांपासूनच प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता दहा दिवस झाले असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ७५ कोटीहून अधिक गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे. 

दे दे प्यार दे या चित्रपटाने पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यात देखील खूप चांगला गल्ला जमवायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ३.५८ करोड, शनिवारी ४.७८ आणि रविवारी ५.६८ करोड इतकी कमाई केली. केवळ तीन दिवसांत १४ करोडचा गल्ला जमवत हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या पी.एम.नरेंद्र मोदी आणि इंडियाज मोस्ट वाँटेड या चित्रपटांना तगडी टक्कर देत आहे. या चित्रपटाचे हे कलेक्शन पाहाता हा चित्रपट लवकरच १०० करोडचा टप्पा पार पाडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दे दे प्यार दे या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ६१.०५ करोड कमावले होते. हा चित्रपट ३१०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला पहिल्या दिवशीच खूप चांगले ऑपनिंग मिळाले होते. 

दे दे प्यार दे या चित्रपटात अजय देवगणतब्बू आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबतच जिमी शेरगिल आणि आलोक नाथ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित झाला असून अजय या चित्रपटात ५० वर्षाच्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याचे एका २६ वर्षांच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळत आहे. तब्बू त्याच्या पूर्वपत्नीची तर रकुल त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अकीव अलीने केले आहे. 


Web Title: De De Pyaar De box-office collection day 10: Ajay Devgn starrer continues to shine; hits the Rs 75 crore mark
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.