ठळक मुद्देTshering Phintso Denzongpa (शेरिंग फिंटसो डेन्झोपा) असे डॅनी यांचे नाव असून चित्रपटसृष्टीत येण्याआधी त्यांनी त्यांचे नाव बदलून डॅनी असे ठेवले. 

डॅनी डेन्झोपाचा आज वाढदिवस असून त्यांनी एक खलनायक म्हणून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म हा सिक्कीममधील असून त्यांचे शित्रण नैनितालमध्ये झाले आहे. त्यांना भारतीय सैन्यात भर्ती व्हायचे होते. त्यांचे त्यासाठी प्रयत्न देखील सुरू होते. पण अचानक त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि ते अभिनयक्षेत्राकडे वळले. जया बच्चन या त्यांच्या बॅचमेट होत्या. तेव्हापासून त्या दोघांची खूप चांगली मैत्री आहे.

डॅनी डेन्झोपा यांचे खरे नाव काय आहे तुम्हाला माहीत आहे का? त्यांचे खरे नाव भलेमोठे असून उच्चार करण्यासाठी देखील ते खूपच कठीण आहे. Tshering Phintso Denzongpa (शेरिंग फिंटसो डेन्झोपा) असे त्यांचे नाव असून चित्रपटसृष्टीत येण्याआधी त्यांनी त्यांचे नाव बदलून डॅनी असे ठेवले. 

डॅनी यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या करियरला सुरुवात केली. पण मेरे अपने या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. धुंद या चित्रपटाद्वारे ते खलनायकाच्या भूमिकेकडे वळले. त्यांनी चोर मचाये शोर, फकिरा, देवता, काला सोना, अग्निपथ, हम, सनम बेवफा, क्रांतीवीर, विजयपथ, खुदा गवाह, बरसात, घातक यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांना आजवर त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी फिर वही रात, राम यांसरख्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी काला सोना, नया दौर यांसारख्या चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली आहे. 

Web Title: danny denzongpa real name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.