जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे भारतात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 वर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरात आहे. तर अनेकांना वर्क फ्रॉम करावं लागत आहे. सिनेमाचे शूटिंग बंद असल्यामुळे कलाकारांनी ही घरात राहणं पसंत केले आहे. सलमान खानची अभिनेत्री डेजी शहाने स्वत:ला घरात क्वारांटाईन करुन घेतले आहे.

डेजीने सोशल मीडियावर तिचा भेंडी चिरतानाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. डेजीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहे. फॅन्सनी तिला घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.

डेजीच्या आधी कतरिना कैफने सुद्धा घरात भांडी घासतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सध्या बॉलिवूडचे सगळेच स्टार सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह झाले आहे. इन्स्टाग्राम - ट्विटरच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत.

Web Title: Daisy shah cuts lady finger in self isolation gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.