ठळक मुद्देडब्बू रत्नानीच्या कॅलेंडरवर अभिनेत्री कियारा अडवाणीने टॉपलेस फोटो आहे. या फोटोत कियारा एका पानाच्या आड उभी आहे.

बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी सेलिब्रिटी कॅलेंडर लॉन्च करतो. दरवर्षी या कॅलेंडरवर बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी वेगवेगळ्या ग्लॅमरस पोजमध्ये झळकतात. कॅलेंडर लॉन्च झाल्यावर दरवर्षी या कॅलेंडरची चर्चा रंगते. नेहमीप्रमाणे ती यावषीर्ही रंगली. पण जरा वेगळ्या कारणाने. होय, बॉलिवूडचे सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे 2020 चे कॅलेंडर लॉन्च झाले आणि या कॅलेंडरसाठी अभिनेत्री कियारा अडवाणीने दिलेल्या पोजवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. कियाराने या फोटोसाठी दिलेली पोज आणि या फोटोशूटचा कॉन्सेप्ट चोरीचा असल्याचा आरोप झाला. डब्बू रत्नानीने इंटरनॅशनल फोटोग्राफरचा कॉन्सेप्ट चोरला, कॉपी केला, असे काय काय म्हटले गेले. आता या आरोपांवर डब्बूने उत्तर दिले आहे.


‘मी कुणाचीही कल्पना चोरलेली नाही. तर 2002 मध्ये माझ्याच कॅलेंडरसाठी तब्बूने दिलेला बोल्ड लूक रिक्रिएट केला,’ अशा शब्दांत डब्बूने ट्रोलर्सची बोलती बंद केली. आपल्या पोस्टसोबत डब्बूने तब्बूचा जुना फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘तब्बूचा हा सदाबहार व सुंदर फोटो मी 2001 मध्ये घेतला होता आणि 2002 च्या माझ्या कॅलेंडरवर छापला होता. 2020 च्या कॅलेंडरमधील कियाराच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.  मी माझा कॅमेरा दुस-यांदा वापरू शकतो तर माझा स्वत:चा कॉन्सेप्टही दुस-यांदा वापरू शकतो. यावर ट्रोलर्सचा आक्षेप असेल तर होय,मी चोरी केली. मात्र मी दुस-याची नाही तर स्वत:ची कल्पना चोरली. माझ्यावर विश्वास दाखवणा-यांचा मी आभारी आहे. माझ्यासाठी केवळ हा विश्वास महत्त्वाचा आहे.’

डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरवर अभिनेत्री कियारा अडवाणीने टॉपलेस फोटो आहे. या फोटोत कियारा एका पानाच्या आड उभी आहे. फोटोग्राफ मेरी बार्शने या फोटोवर आक्षेप घेत, इन्स्टाग्राम स्टोरीवर डब्बूची पोलखोल केली होती. डब्बूने आपल्या कॅलेंडरसाठी आपला कॉन्सेप्ट चोरल्याचा आरोप तिने केला होता. याचा खुलासा करताना, ‘मी यापेक्षा अधिक काहीच बोलू इच्छित नाही, ’ असे मेरीने लिहिले होते.

Web Title: dabboo ratnani clarifies about the kiara advani topless picture for his 2020 calendar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.