'देश मोठ्या संकटातून जातोय...', अनुपम खेर उतरले कोरोना विरुद्धच्या लढाईत मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:23 PM2021-05-12T15:23:30+5:302021-05-12T15:24:02+5:30

अभिनेते अनुपम खेरदेखील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

'The country is going through a big crisis ...', Anupam Kher landed on the field in the battle against Corona | 'देश मोठ्या संकटातून जातोय...', अनुपम खेर उतरले कोरोना विरुद्धच्या लढाईत मैदानात

'देश मोठ्या संकटातून जातोय...', अनुपम खेर उतरले कोरोना विरुद्धच्या लढाईत मैदानात

Next

देशभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहे. काही सेलिब्रेटीदेखील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. दरम्यान आता अभिनेते अनुपम खेरदेखील मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनुपम खेर फाउंडेशनने डॉ आशुतोष तिवारी (ग्लोबल कैंसर फाउंडेशन, यूएसए) आणि बाबा कल्याणी (भारत फोर्ज, इंडिया) यांच्यासोबत मिळून नुकतीच ‘प्रोजेक्ट हील इंडिया’ नामक योजनेची सुरूवात केली आहे. याचा उद्देश्य, या कठीण काळात देशभरात कोविड-१९ च्या विरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत मदत करणे हा आहे.


या प्रकल्पांतर्गत, ही संस्था संपूर्ण भारतात गरजू संस्थांना आणि हॉस्पिटल्स ना महत्वपूर्ण उपकरणे आणि इतर लाइफ सपोर्टिंग साधने प्रदान करणार आहेत. क्रॉसवेंट वेंटिलेटर (आईसीयु क्रिटिकल केयर), मेडट्रोनिक वेंटिलेटर, रेसमेड नॉन-इनवेसिव वेंटिलेशन डिवाइस आणि ऑक्सीजन कंसंट्रेटर्सची पहिली तुकडी या आठवड्याभरात भारतात येण्याची आशा आहे.  


याविषयी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, “या वैश्विक संकटात, आपण माणूस म्हणून नेहमीच सामूहिक रुपात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी एकत्रितपणे सरसावलो आहोत. भारत मोठ्या संकटातून जात आहे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपले कर्तव्य पार पाडावे. जगभरात असंख्य लोकांच्या मदत करण्याच्या पद्धतींबद्दल चौकशी केली मात्र, डॉ. आशुतोष तिवारी एका ठोस योजनेसोबत पुढे येणारे पाहिलेच होते. यातून मला या देशाला पुढे नेण्याची आणि आपल्या देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.

हे सर्व काही माननीय बाबा कल्याणी आणि डॉ आशुतोष तिवारी यांच्यासारख्या मानवतावादी लोकांमुळे आहे जे जगाला उत्तम बनवण्यासाठी मदत करतात आणि मानवतेवरील आपला विश्वास अधिक ठाम बनवतात. त्यांच्यासोबत जोडले जाणे हा मी माझा स्वत:चा गौरव समजतो आणि याचा मला आनंद आहे.” 


यासोबतच, ‘प्रोजेक्ट हील इंडिया’द्वारे आपल्या लोकांची आणि आपल्या समाजाची मदत करण्यासाठी निधी, औषधे आणि इतर अत्यावश्यक संसाधने पुरवण्यात येणार आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'The country is going through a big crisis ...', Anupam Kher landed on the field in the battle against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app