कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना पहायला मिळते आहे. या व्हायरसमुळे देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सगळे सेलिब्रेटी घरात क्वारंटाईन झाले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉ़झिटिव्ह आल्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. तिच्या हलगर्जीपणामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोलही करण्यात आले. त्यानंतर आता अभिनेत्री राधिका आपटे ही नुकतीच एका हॉस्पिटलमध्ये स्पॉट झाली. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाली की काय, अशी चिंता तिचे चाहते व्यक्त करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो यात किती तथ्य आहे.


अभिनेत्री राधिका आपटे शूटिंग रद्द झाल्यामुळे लंडनला गेली आहे. तिथे तिचा नवरा राहतो. त्यामुळे ती शूटिंग रद्द झाल्यामुळे लंडनला गेली आहे. ही माहिती तिनेच दिली होती.


त्यानंतर आता तिने इंस्टाग्रामवर एका हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने चेहऱ्यावर मास्कही लावलेला दिसतो आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की, हॉस्पिटलला भेट. कोरोनासाठी नाही. काळजी करण्याचे काहीच कारण नाही. सगळं काही नीट आहे. सुरक्षीत आणि क्वारंटाईन.


राधिकाच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. कुणी तिला काळजी घेण्यासाठी सांगत आहे तर कुणी तिला अशा परिस्थितीत हॉस्पिटलला जायला नव्हते पाहिजे, अशा कमेंट्स करत आहेत.


भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. तर 700 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला

Web Title: CoronaVirus: Radhika Apte contracted corona? Spot on the hospital Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.