ठळक मुद्देअगदी अलीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रियंकाने एक व्हिडीओ शेअर केला होता.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. केवळ सोशल मीडियावरच नाही तर बाहेरच्या जगातही ती तितकीच अ‍ॅक्टिव्ह दिसते. पार्ट्या असो वा इव्हेंट प्रियंका प्रत्येक इव्हेंटला पोहोचते. पण तूर्तास प्रियंका स्वत:च्या घरात कैद झाली आहे. कारण काय तर कोरोना.
होय, प्रियंकाने स्वत: ही माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या प्रियंकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसतेय. ‘सध्या घरात राहणेच सुरक्षित आहे. अशात जीनोचे (प्रियंकाच्या डॉगीचे नाव) जवळ येणे किती आनंददायी आहे,’ असे या फोटोसोबत तिने लिहिले आहे.


आता प्रियंकाने एखादी पोस्ट केली आणि ती व्हायरल झाली नाही, असे शक्यच नाही. प्रियंकाचा हा फोटोही तुफान व्हायरल होतोय. लोकांनी त्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.

अगदी अलीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रियंकाने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत प्रियंकाने नमस्तेचे महत्त्व सांगितले होते. 
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर ती हॉलिवूडचा चित्रपट ‘मॅट्रिक्स’च्या चौथ्या भागात दिसू शकते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका व निर्मात्यांमध्ये या संदर्भात बातचीत सुरू आहे. आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर तर लवकरच देसी गर्ल या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 अगदी काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा ग्रॅमी अवॉर्डमधील ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा ड्रेस इतका रिलिव्हिंग होता की, यावरून ती ट्रोल झाली होती. यानंतरही तिच्या या डीप नेक गाऊनची अनेक दिवस चर्चा होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus priyanka chopra remains indoor playing pet dog gino pics viral-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.