कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांना घरात बंद केले आहे. भारतातील काही शहर लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यानंतर सर्व लोक पूर्णपणे आपल्या घरात बंद आहेत आणि आता त्यांच्याकडे खूप वेळ आहे. यादरम्यान बॉलिवूडचे सेलिब्रेटी वेगवेगेळ्या पद्धतीने आपला वेळ व्यतित करत आहेत. शूट व इतर कामांमध्ये व्यस्त असणारे कलाकार आता सोशल मीडियावर जास्त वेळ व्यतित करताना दिसत आहेत. नुकताच मिलिंद सोमणने पत्नी अंकिता कुंवरसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती मिलिंदचा हेड मसाज करताना दिसते आहे.

मिलिंद सोमणने सेल्फ आइसोलेशनच्या सहाव्या दिवशी अंकिता कुंवरसोबत वेळ व्यतित करताना दिसत आहे या फोटोत पहायला मिळतंय की मिलिंदची पत्नी अंकिता त्याचा हेड मसाज करत आहेत. तर कॅप्शनमध्ये मिलिंद सोमणने म्हटलं की, केसात नारळाच्या तेलाने मालिश करत आहे.

या फोटोच्या आधी मिलिंद सोमण व अंकिता कुंवरचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात अंकिता गिटार वाजवताना दिसली होती.  यात ती शानिया ट्वेनचे यू आर स्टिल वन हे गाणं गात गिटार वाजवताना दिसली. तिचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला.


मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. लग्नाच्या पूर्वी ही जोडी त्यांच्या वयातील अंतरामुळे चर्चेत आली होती.

मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.

Web Title: Coronavirus: Milind Soman And his wife Ankita Kunwar spend time together in quarantine tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.