CoronaVirus : लॉकडाउनमध्ये कार्तिक आर्यन 'बागबान 2'साठी करतोय नायिकेचं कास्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 01:34 PM2020-04-06T13:34:57+5:302020-04-06T13:36:24+5:30

लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर कार्तिक आर्यन अभिनेत्रीच्या शोधात

CoronaVirus: Karthik Aryan casting heroine in 'Lockdown' | CoronaVirus : लॉकडाउनमध्ये कार्तिक आर्यन 'बागबान 2'साठी करतोय नायिकेचं कास्टिंग

CoronaVirus : लॉकडाउनमध्ये कार्तिक आर्यन 'बागबान 2'साठी करतोय नायिकेचं कास्टिंग

googlenewsNext

देशात लॉकडाउन सुरू झाले तेव्हापासून अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टेंसिंगबद्दल लोकांमध्ये जनजागृती करतो आहे आणि सर्वांना घरात थांबण्याचे आवाहन करत आहे. कार्तिक स्वतः लॉकडाउनचे नियमांचे पालन करतो आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे.

लॉकडाउनमध्ये कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. त्याने नुकतेच त्याचा चित्रपट पति पत्नी और वोमध्ये त्याने साकारलेले लोकप्रिय पात्र चिंटू त्यागीच्या फोटोला अॅपच्या मदतीने वयस्कर व्यक्तीमध्ये रुपांतर केले आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, एजिंग ग्रेसफुली इन लॉकडाऊन. आता बागबानचा रिमेक करूयात. अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी कास्टिंग सुरू. प्लीझ तुमच्या एन्ट्री पाठवा.

कार्तिकची पति पत्नी और वोमधील सकहकलाकार भूमी पेडणेकरने कमेंट करत म्हटलं की, सर प्लीज चेक माय प्रोफाइल. त्यावर कार्तिकने उत्तर दिले की, धन्यवाद, तुम्हाला कॉल केला जाईल तर तुमची निवड झाली आहे. भूमीने तिच्या पेजवर सांड की आँख चित्रपटातील फोटो पोस्ट करत लिहिले की, कार्तिक आर्यन सर चित्रपटाच्या कास्टिंगसाठी प्रोफाईल पाठवत आहे. पूर्ण शोरिल देखील आहे. या चित्रपटाचं नाव आहे सांड की आँख. प्लीज तुमच्या सिनेमात मला घ्या. फक्त भूमीच नाही तर जान्हवी कपूरनेदेखील लिहिलं की, माझीदेखील एन्ट्री पाठवत आहे. आशा आहे की मी त्या भागासाठी खूप जुनी आहे. मी कथक कररू शकते आणि माझ्याकडे पासपोर्ट आहे. त्यावर कार्तिकने विचारले की, तुमच्याकडे चायनिस व्हिसा आहे का? या चित्रपाचा सेट चीनमध्ये आहे.

या दोघींव्यतिरिक्त अर्जुन कपूर व सिद्धांत चतुर्वेदीने कार्तिकच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट केली आहे.

 

Web Title: CoronaVirus: Karthik Aryan casting heroine in 'Lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.