Coronavirus crisis: Madhuri Dixit donate to PM-CARES Fund PSC | CoronaVirus : मदतीला पुढे आली बॉलिवूडची धकधक गर्ल, केली मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत

CoronaVirus : मदतीला पुढे आली बॉलिवूडची धकधक गर्ल, केली मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत

ठळक मुद्देमाधुरी दीक्षितने पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत किती रुपयांची मदत केली आहे हे तिने न सांगणेच पसंत केले आहे. पण लोकांनी देखील या चांगल्या कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे तिने लोकांना आवाहन केले आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. प्रत्येकाने घरातच राहावे असे आवाहन लोकांना केले जात आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अभिनेत्री माधुरी दीक्षितने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत केली आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.

माधुरी दीक्षितने ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, आपण सगळ्यांनी मिळून हे युद्ध जिंकण्याची गरज आहे. मी माझ्याकडून काही रक्कम पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत जमा करत आहे. तुम्ही देखील पुढे येऊन मदत करा.... आणि आपण सगळे मिळून या संकटावर मदत करूया...

माधुरी दीक्षितने पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत किती रुपयांची मदत केली आहे हे तिने न सांगणेच पसंत केले आहे. पण लोकांनी देखील या चांगल्या कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे तिने लोकांना आवाहन केले आहे. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. काहीजणांचे तर खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक गरीब लोकांवर तर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे. 

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, वरुण धवन, शिल्पा शेट्टी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Web Title: Coronavirus crisis: Madhuri Dixit donate to PM-CARES Fund PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.