Corona Virus: अशा रितीने कोरोना करतो हल्ला, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 07:37 PM2020-03-25T19:37:40+5:302020-03-25T19:37:48+5:30

आतापर्यंत देशात 562 पॉझिटिव्ह आणि 512 सक्रिय प्रकरणे नोंदविली आहेत. आज संसर्गाची 62 प्रकरणे वाढली आहेत.

Corona Virus: Shefali shah Explained This Is How covid 19 attacks-SRJ | Corona Virus: अशा रितीने कोरोना करतो हल्ला, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Corona Virus: अशा रितीने कोरोना करतो हल्ला, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

googlenewsNext

कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर गेली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

सध्या प्रत्येक जण या संसर्गाज्य आजाराशी लढत आहे. सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचा व्हिडीओ इतरांचाही थरकाप उडवत आहे. या व्हिडीओत दिसत असलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे शेफाली शहा. आतापर्यंत सेलिब्रेटींनी कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढतो याबाबत माहिती देताना आपण पाहिलेच आहे. मात्र शेफालीने अशा प्रकारे स्वतःला प्लॅस्टीक पिशवीने चेहरा झाकत याचे महत्त्व पटवून दिले आहे. सध्या सर्वांना बाहेर न पडता घरातच राहण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. तरी काही लोकांना या गोष्टीकडे दुर्लक्ष करत बाहेर फिरताना पाहायला मिळत आहे. इथे घरात राहा सुरक्षित राहा असे सांगत आता प्रत्येकाच्या घशाला कोरड पडत चालली आहे तरी लोकांना याचे गांभिर्य नाही. त्यामुळे शेफालीचा हा व्हिडीओ अशा लोकांना समजवण्याचा हा छोटासा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओत शेफालीन म्हटले की, जेव्हा कोरोना आपल्यावर हल्ला करतो तेव्हा फुफ्फुसांना असेच जखडल्यासारखे वाटते. आपल्यावरही असे संकट येऊ नये.  वेळीच सावध व्हा घरीच रहा आणि आपल्या स्वत: च्या, आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या सुरक्षेसाठी करा. कारण जर एखादी व्यक्ती बाहेर असेल तर ती त्याला सोबत आणते आणि नंतर ते जंगलातील आगीसारखे पसरते, जे पसरले आहे.' जर हा इशारा पुरेसा नसेल तर आपण कसे समजून घ्याल ते मला माहित नाही.

 

मी श्वास घेण्यास सक्षम नाही आणि लवकरच जर हा रोग पसरला तर आपल्या प्रेमाच्या पुष्कळ लोकांना श्वास घेता येणार नाही याकडेही लक्ष द्या अशी कळकळीने तिने विनंती केल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Web Title: Corona Virus: Shefali shah Explained This Is How covid 19 attacks-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.