Corona Virus : Pooja Bedi asked government is this lockdown? Tjl | बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करत सरकारवर साधला निशाणा, म्हणाली - हे लॉकडाउन आहे का?

बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करत सरकारवर साधला निशाणा, म्हणाली - हे लॉकडाउन आहे का?

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. मोदी सरकारच्या आदेशानंतरही लोक घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यासोबत पोलीस सक्तीने वागत आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने या लॉकडाउन संदर्भातील एक फोटो शेअर केला आहे आणि केंद्र सरकार व राज्य सरकारला सवाल केला आहे. पूजा बेदीचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्यावर कमेंट करत आहे.


पूजा बेदीने बीचचा फोटो शेअर करत लिहिले की, हे लॉकडाउन आहे का? या समुद्र किनाऱ्याला सुट्टी ? अशाप्रकारे आपण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येवर रोख कसे लावू शकतो ?  पूजा बेदीने या ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्र व राज्य सरकारावर निशाणा साधला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत स्पष्ट दिसतंय की, लॉकडाउनमध्येदेखील काही लोक बीचवर सुट्टी एन्जॉय करत आहेत. भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 649 झाली आहे आणि आतापर्यंत 13 लोकांचा बळी गेला आहे.


पूजा बेदी प्रसिद्ध अभिनेता कबीर बेदीची मुलगी आहे. पूजा आमीर खानचा चित्रपट जो जीता वहीं सिकंदरसाठी ओळखले जात आहे.

पूजा बेदी बॉलिवूडमध्ये यश मिळवू शकली नाही. मात्र झलक दिखला जा 1, नच बलिए 3 आणि बिग बॉस 5 या टीव्ही शोमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. तसेच पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवालाने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Web Title: Corona Virus : Pooja Bedi asked government is this lockdown? Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.