ठळक मुद्दे प्रिन्स चार्ल्स नेमके कोठे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोरोना व्हायरसमुळे देश आणि जगात हाहाकार माजला आहे. संपूर्ण जगात कोरोनाने लाखो बळी घेतले आहेत. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीतही कोरोना व्हायरस पोहोचला आहे. इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 71 वर्षांचे प्रिन्स चार्ल्स अलीकडे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. अशात बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी प्रिन्स चार्ल्स लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. स्पॉटबॉयशी बोलताना पद्मिनी यांनी चार्ल्स प्रिन्स यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. माझी प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करते, असे पद्मिनी म्हणाल्या.

पद्मिनींनी केले होते प्रिन्स चार्ल्सला किस

आज प्रिन्स चार्ल्स यांच्यासाठी प्रार्थना करणा-या पद्मिनी एकेकाळी चार्ल्स यांच्यामुळे चर्चेत आल्या होत्या. होय,1980 मध्ये प्रिन्स व पद्मिनी यांच्या किसची प्रचंड चर्चा झाली होती. प्रिन्स भारतभेटीवर आले असतानाची ही घटना. त्यावेळी पद्मिनींनी पुष्पहार घालून प्रिन्स यांचे स्वागत केले होते आणि यानंतर प्रिन्स यांच्या गालाचे चुंबन घेतले होते.

 त्यावेळी पद्मिनी केवळ 15 वर्षांच्या होत्या. पद्मिनींनी गालाचे चुंबन घेतल्यामुळे काही क्षण प्रिन्सही अवाक् झाले होते. या चुंबनाची प्रचंड चर्चा झाली होती. सिनेमाच्या इतिहासातील वादग्रस्त घटनांमध्ये आजही या घटनेचा उल्लेख केला जातो.
प्रिन्स चार्ल्स सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.  त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी कामिला यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. प्रिन्स चार्ल्स नेमके कोठे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: corona virus padmini kolhapure wishes for prince charles speedy recovery made headlines for kissing him-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.