ठळक मुद्देकनिका कपूर 9 मार्चला लंडनमधून भारतात परतली होती.

बॉलिवूड सिंगर कनिका कपूरची कोरोनाची चौथी चाचणीही पॉझिटीव्ह आली. सध्या लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रेज्युएट इंस्टीट्यूटमध्ये कनिकावर उपचार सुरु आहेत.   चौथा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने कनिका व तिच्या कुटुंबीयांच्या चिंता वाढल्या आहे. कनिका मुलांच्या आठवणीने बेजार झाली आहे.
कनिका गत 20 मार्चला रूग्णालयात भरती झाली. तेव्हापासून ती रूग्णालयात आहे. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर पहिल्यांदा कनिकाने पोस्ट लिहिली आहे.

काय लिहिले कनिकाने आपल्या पोस्टमध्ये...

झोपायला जातेय, तुम्हा सगळ्यांना प्रेम़ सुरक्षित राहा़ माझी चिंता केल्याबद्दल आभार. पण मी आयसीयूमध्ये नाही़ मी ठीक आहे. माझी पुढची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येईल, अशी आशा करते. माझ्या मुलांजवळ आणि कुटुंबीयांजवळ परत जाण्याची वाट पाहतेय. मी त्यांना खूप मिस करतेय..., असे कनिकाने लिहिले आहे.

या पोस्टसोबत कनिकाने कमेंट सेक्सन बंद केले आहे. याचा अर्थ कनिकाच्या या पोस्टवर कुणीही कमेंट करू शकत नाही. कनिका कोरोना पॉझिटीव्ह आल्यापासून सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. तिने निष्काळजीपणा बाळगल्याचा आरोप आहे.

कनिका कपूर 9 मार्चला लंडनमधून भारतात परतली होती. त्यांनंतर जवळपास 10 दिवस ती वेगवेगळ्या लोकांना भेटली. याशिवाय तिने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. त्यानंतर 20 मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यामध्ये तिने आपण लंडनमधून परतल्यावर ठिक होतो मात्र मागच्या 2 दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याचे तिने म्हटले होते़ मात्र तिच्या निष्काळजीपणासाठी आणि इतर लोकांच्या आरोग्यशी खेळल्याबाबत उत्तरप्रदेशात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तिच्याविरोधात एक नाही तर तिन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत़

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona virus kanika kapoor first post after corona positive reveals health upadtes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.