Corona Virus: Actor Sameera Reddy Break Down, who is also under quarantine amid coronavirus outbreak-SRJ | Corona Virus: ही गोष्ट कळताच ढसा ढसा रडली समीरा रेड्डी, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Corona Virus: ही गोष्ट कळताच ढसा ढसा रडली समीरा रेड्डी, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

कोरोना विषाणूचा संसर्ग थांबतच नाहीय. या विषाणूने सामान्य लोकांपासून स्टार्सनाही भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त संख्येत वाढ होत असल्याचे चित्र जगात पाहायला मिळत आहे. यात अनेकाना  कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कुठेतरी या गोष्टीला आळा बसावा, कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी शासनाकडून उपायोजना सांगण्यात येत आहे. शासनाच्या आदेशनानुसार आता २१ दिवसांचाही भारतात लॉक डाऊन करण्यात आला आहे. नेहमी आनंदी असणारी हसतमुखान सा-यांशी संवाद साधणारी अभिनेत्री समीरा रेड्डी मात्र आज कोरोनामुळे झालेली स्थिती पाहून ढसा ढसा रडली. त्यात तिला तिच्या मुलांची काळजी सतावत असल्याचे तिने म्हटले आहे. व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

जगात बाहेर काय सुरू आहे याची लहान मुलांना अजिबात कल्पना नाही, सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे यात नेमकं काय सुरू आहे हे लहान मुलांना पटवून देणं तितकंच कठिण आहे. ही परिस्थिती मुलांसाठी अजिबात चांगली नाही. सतत त्याच गोष्टीने आता मी हैराण झाली आहे. मन खूप चिंतीत असून यातून सुटका कधी होणार याकडेच लक्ष लागल्याचे तिने म्हटले आहे. लहान मुलांना देधील या भयावह वातावरणाला समारे जावे लागत आहे हे सगळं खूप निराशाजनक आहे. आशा करते लवकरात लवकर सगळे ठिक होईल तो पर्यंत सगळ्यांनी योग्य ती काळजी घ्या आणि यापासून स्वत:चा कसा बचाव करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. इतरांची काळजी घ्या सांगत कोरोना विषयी तिच्या मनातील घालमेल दूर केली आहे.

समीराने गेल्या 12 जुलैला नायराला जन्म दिला. हे तिचे दुसरे अपत्य असून तिला एक मुलगा देखील आहे. इन्स्टाग्रामला तिच्या मुलाचे फोटो, व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक अक्षय वदेर्सोबत लग्न केले होते.

Web Title: Corona Virus: Actor Sameera Reddy Break Down, who is also under quarantine amid coronavirus outbreak-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.