Corona Lock Down: Swara Bhaskar's No makeup look went viral | Corona Lockdown: विना मेकअप लूक झाला व्हायरल, ओळखणेही झाले कठिण

Corona Lockdown: विना मेकअप लूक झाला व्हायरल, ओळखणेही झाले कठिण

ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.  आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इतर अभिनेत्रींप्रमाणे आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत तिच्या अनेक फोटोंवर  दिसून येते.  वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून तिला ओळखणेही अशक्यच आहे. अनेकांना तिचा हा विनामेकअप लूक पाहून थक्कच होत आहेत. कारण ही अभिनेत्री आहे स्वरा भास्कर.स्वरा भास्करच्या या फोटोला अनेकांना हा क्वॉरंटाईन लूक म्हणूनही तिला कमेंट केल्या आहेत. संपूर्ण लॉक डाऊन असल्यामुळे नेहमी मेकअपमध्ये दिसणा-या अभिनेत्रींचा मेकअप उतरल्याने खरा चेहरे समोर येत आहेत. त्यामुळे स्वराची लॉक डाऊनमुळे अशी अवस्था झाली का? असेही युजर्स म्हणत आहेत.


अर्थात स्वराचा हा फोटो जुना असून  एका मेडीकल शॉपमध्ये गेली असताना हा फोटो मीडियाच्या कॅमे-यात कैद झाला आहे. हा फोटो पाहून काहींनी तिला ओळखलेही नाही.मात्र ज्यांनी ज्यांनी स्वराला या फोटोत ओळखले. त्यांनी तिचे कौतुकच केले आहे. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते. पण स्वरा या ट्रोलिंगची पर्वा करत नाही. पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वरा एका उमेदवाराचा प्रचार करताना दिसली होती. बिहारमधील बेगूसुराई लोकसभा मतदार संघात कन्हैय्या कुमारचा तिने हिरहिरीने प्रचार केला होता. याच निवडणूकीचा प्रचा करणे अनेकांना खडटकले होते  कन्हैया कुमारचा निवडणुकीत प्रचार केल्यामुळे तिला हातचे चार मोठे ब्रँड गमवावे लागले होते . स्वरा भास्करने 'वीरे दी वेडिंग', 'नील बटे सन्नाटा', 'रांझणा' अशा विविध हिंदी सिनेमात स्वराने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वीत स्वराविरोधात थेट कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.  स्वरा धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला  होता. 

Web Title: Corona Lock Down: Swara Bhaskar's No makeup look went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.