Confirming the marriage of Prabhas, the family members gave their information | कन्फर्म! प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म
कन्फर्म! प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म

ठळक मुद्देप्रभास लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती आहेबाहुबलीनंतर प्रभासच्या लग्नाच्या चर्चा नेहमीच होताना दिसतात

बाहुबली सिनेमानंतर अभिनेता प्रभास रातोरात स्टार झाला. ‘बाहुबली-२’मध्ये त्याच्या अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीचे नाव त्याच्याशी नेहमीच जोडले जाते. पडद्यावरदेखील दोघांची केमिस्ट्री  चांगलीच रंगली होती. सध्या तो त्याचा आगामी सिनेमा 'साहो'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मात्र आता पुन्हा एकदा प्रभासच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. 


प्रभास लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. प्रभासचे काका कृष्णम राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार साहोची शूटिंग आटपल्यावर प्रभास बोहल्यावर चढणार आहे. पण प्रभास कोणासोबत लग्न करणार आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. बाहुबलीनंतर प्रभासच्या लग्नाच्या चर्चा नेहमीच होताना दिसतात. त्यामुळे आता ही बातमी तरी किती खरी हे साहोच्या शूटिंगनंतर कळेलच. प्रभास आणि अनुष्का दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या बातम्या कायम नाकारल्या. त्यामुळे आता प्रभास अनुष्कासोबतच सात फेरे घेणार का ?. याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

साहोबाबत बोलायचे झाले तर यात प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे. एमी जैक्सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तव सारखे कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहेत. ‘साहो’नंतर प्रभास लगेच दिग्दर्शक के के राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे.


Web Title:  Confirming the marriage of Prabhas, the family members gave their information
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.