complaint againt actress vaani kapoor for hare ram outfit |  या अभिनेत्रीला ते ‘बिकनी टॉप’ घालणे पडले महागात, पोलिसात तक्रार
 या अभिनेत्रीला ते ‘बिकनी टॉप’ घालणे पडले महागात, पोलिसात तक्रार

ठळक मुद्देवाणीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत वाणीने डीप नेक टॉप परिधान केला होता.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री वाणी कपूर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, सोशल मीडियावर वाणीने शेअर केलेला एक फोटो वादाचे कारण ठरला आहे. वाणीचा हा फोटो पाहून नेटकरी इतके संतापले की, वाणीला हा फोटो डिलीट करावा लागला. पण याऊपरही तिच्यावरची टीका थांबली नाही. आता तर मुंबईत वाणीविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत वाणीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
रमा सावंत यांनी एन एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. 


मॉडेलिंगपासून सुरुवात करणाºया वाणी कपूरने ‘शुद्ध देसी रोमांस’ या सिनेमातून  बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘बेफिक्रे’ या सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसली होती. वाणी नुकतीच ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत ‘वॉर’ या अ‍ॅक्शन सिनेमात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.    

काय आहे प्रकरण
वाणीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत वाणीने डीप नेक टॉप परिधान केला होता. या टॉपमध्ये  कमालीची सुंदर दिसत असल्याने अनेकांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला होता. पण अचानक तिच्या या टॉपवर लिहिलेल्या अक्षरांवर काही युजर्सचे लक्ष गेले आणि ते भडकले होते. होय, वाणीच्या या टॉपवर ‘हरे राम हरे कृष्णा’ लिहिलेले होते. ते पाहून लोक भडकले. लोकांनी वाणीला फैलावर घेतले. काहींनी तर तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. काहींनी तिच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वाणीचा हा फोटो धार्मिक भावना दुखावणारा असल्याचा दावा अनेकांनी केला. टॉपचा हा वाद अंगलट येत असल्याचे पाहून वाणीने संबंधित फोटो डिलीट करणे योग्य समजले. अद्याप वाणीने यासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: complaint againt actress vaani kapoor for hare ram outfit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.