ठळक मुद्देहा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 19 तासांत 5 लाख 80 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

जॉनी लिव्हरचा त्याच्या मुला-मुलीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जॉनी त्याच्या दोन्ही मुलांसोबत नाचताना दिसत आहे आणि या डान्सद्वारे कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळण्याविषयी सांगत आहे.

जॉनी जीमी आणि जेसी या दोन्ही मुलांसोबत या व्हिडिओत नाचताना दिसत असून डोन्ट टच मी असे सांगत आहे. या व्हिडिओसोबत एकमेकांमध्ये अंतर ठेवा आणि मास्क घाला असा संदेश देताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 19 तासांत 5 लाख 80 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.  

जॉनीदेखील सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला अनेकवेळा त्याच्या कुटुंबियांचे फोटो पाहायला मिळतात. 

जॉनी लिव्हरची मुलगी जीमीने त्याच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे तर त्याचा मुलगा जेसीने देखील काही कॉमेडी शो केले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे. जॉनीच्या पत्नीचे नाव सुजाता असून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात ती तिच्या पाठिशी उभी राहिली आहे. तसेच जॉनी आज जे काही मिळवले आहे त्याचे श्रेय तो कुटुंबाला देतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Comedian Johny Lever's first reel with his kids will surely crack you up, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.