दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा मुलगा राम चरण टॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेता आहे. २००७ साली 'चिरुथा' चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीतील करियरला सुरूवात केली आहे. राम चरणचे फॅन फॉलोविंग वडील चिरंजीवींना इतकंच आहे. नुकताच राम चरणचे वडील व सुपरस्टार चिरंजीवी यांचा 'सई रा नरसिम्हा रेड्डी' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तेलगू बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गोष्टींमुळे राम चरण खूप खूश आहे. चिरंजीवी यांच्यासारखे राम चरण टॉलिवूडमधील टॉप अभिनेता आहे. 

चित्रपटांव्यतिरिक्त ब्रॅण्ड एंडोर्समेंट्स आणि पर्सनल इन्व्हेसमेंटमधून पैसे कमावणारे राम चरण हैदराबादमधील जुबली हिल्स सारख्या प्राईम लोकेशनमध्ये ३८ कोटींच्या बंगल्यात राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणचे घर दाक्षिणात्य सेलिब्रेटींच्या घरामध्ये खूप महागडे आहे. राम चरण अभिनेत्याशिवाय एक यशस्वी बिझनेसमनदेखील आहे. 


रिपोर्ट्सनुसार, राम चरणची जवळपास १३०० कोटींची प्रॉपर्टी आहे. रामचरण हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालिक आहे. याशिवाय त्याची रामचरण हैदराबाद पोलो राइडिंग क्लब नामक पोलो टीम देखील आहे. तो माँ टीव्हीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील आहे.

रामचरण एका सिनेमासाठी जवळपास १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. रामचरणचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे ज्याचं नाव आहे कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी. राम चरणने दोन तमीळ चित्रपटाची निर्मिती करणार आहे आणि तमीळ चित्रपट 'तूफान'साठी गाणं गायलं आहे. रामचरणची गिनती दाक्षिणात्य सुुपरस्टार्समध्ये होते. त्याने बॉलिवूडमध्ये जंजीर या चित्रपटात काम केले आहे.


रामचरणने १४ जून, २०१२ साली अपोलो हॉस्पिटलमधील एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनीसोबत लग्न केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रामचरण ब्लॉकबास्टर चित्रपट बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या RRR चित्रपटात काम करत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chiranjeevi Son And South Superstar Ram Charan Luxury House Worth Rs 38 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.