ठळक मुद्देआपल्याला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात. स्वीनीला आजही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात.

तब्बू आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चीनी कम हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा ही खूप वेगळी असून ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. तसेच या चित्रपटातील अमिताभ आणि तब्बू यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी त्या दोघांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

या चित्रपटात या दोघांसोबतच परेश रावल, झोरा सेहगल आणि बालकलाकार स्वीनी खरा यांच्या मुख्य भूमिका होत्या. स्वीनीला कॅन्सर झाला असून तिचा लवकरच मृत्यू होणार याची कल्पना सगळ्यांना असते. स्वीनीला देखील तिच्या मृत्यूविषयी माहीत असले तरी तिचे आयुष्य ती खूपच चांगल्याप्रकारे जगत असते. तिला मिळालेल्या छोट्याशा आयुष्यात तिच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करत असते. या चित्रपटातील स्वीनीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटात तिच्या व्यक्तिरेखेचे नाव सेक्सी होतं.चीनी कम हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी स्वीनी खूपच लहान होती. पण आता स्वीनी चांगलीच मोठी झाली असून ती खूपच छान दिसते. आपल्याला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात. स्वीनीला आजही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात.स्वीनीने चीनी कमसोबतच परिणीता, एम एस धोनीः द अल्टोल्ड स्टोरी, देल्ही सफारी, पाठशाला, एलान, चिंगारी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बा बहू और बेबी, दिल मिल गये, जिंदगी खट्टी मिठ्ठी यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे. बा बहू और बेबी या मालिकेत तिने साकारलेली चैताली ही भूमिका चांगलीच गाजली होती.  

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Child actor Swini Khara has grown up to be a pretty diva PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.