नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा नेहमी सोशल मीडियावर आपले स्टायलिश ग्लमॅरस फोटो शेअर करत सा-यांते लक्ष वेधून घेत असते. स्टाइल दिवा म्हणून सोनमनं वेगळीच ओळख निर्माण केलीय. कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्या या नवीन लूकच्या प्रेमात चाहते आहेत. कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत चाहते तिच्यावर अक्षरक्षः फिदा होत आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनमने गोल्ड मेटल  क्रॉप टॉप परिधान केला आहे. त्यात मोकळे सोडलेले केस यामुळे ती अधिक ग्लॅमरस दिसत आहे. सोनमच्या या लूकला खूप पसंती मिळत असून 4 लाख लोकांनी तो पाहिला आहे. सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोनाचा धोका असतानाही सोनम व आनंदने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे गत 19 मार्चला लंडनवरून भारतात परतले होते. यानंतर दोघांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

सोनमने 2018 मध्ये आनंद आहुजा या बिझनेसमनसह लग्नबंधनात अडकली होती. सोनमने तिच्या रिलेशशीपबाबतही कधीच मनमोकळेपणाने बोलली नव्हती. थेट लग्नाची बातमी देत तिने अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. लग्नानंतर ती फारशी सिनेमातही झळकली नाही.'निरजा' आणि 'झोया फॅक्टर' या दोन सिनेमानंतर ती बालिवूडपासून लांब गेली. सध्या ती कोणत्या बाँलिवूड पार्ट्या आणि कोणत्याच पुरस्कार सोहळ्यांमध्येही दिसली नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Check out the hot and cute pics of Gorgeous Sonam Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.