CarryMinati break silence about Youtube Vs TikTok with his upcoming video TJL | Youtube Vs TikTok वर अखेर कॅरी मिनाटीचा एल्गार, म्हणाला - कॅरी करणार रोस्ट 

Youtube Vs TikTok वर अखेर कॅरी मिनाटीचा एल्गार, म्हणाला - कॅरी करणार रोस्ट 

भारतीय लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक असे महायुद्ध रंगले होते. हे महायुद्ध कॅरी मिनाटी व टिक टॉक स्टार आमिर सिद्दीकीमध्ये रंगले होते. युट्यूब व्हर्सेस टिकटॉकवरील कॅरी मिनाटीचा व्हिडिओ मापदंडाविरोधी असल्याचं सांगून युट्यूबने हटविला होता. त्यानंतर कॅरी मिनाटी खूप भावूक झाला होता. त्यानंतर त्याच्या सपोर्टमध्ये इतर प्रसिद्ध युट्यूबर व त्याचे चाहते पुढे आले होते. टिकटॉकवर बंदी करण्याची मागणी होऊ लागली होती. मग, टिकटॉकने आमिर सिद्दीकीचे अकाउंट सस्पेन्ड केले. आता कॅरी मिनाटीने युट्यूब व्हर्सेस टिकटॉकवर चुप्पी तोडली आहे आणि यल्गार केला आहे.

कॅरी मिनाटीने नुकताच युट्यूबवर नवा व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडिओला त्याने यल्गार असं टायटल दिलं आहे. खरेतर त्याने याचा छोटासा टीझर अपलोड केला आहे. यात त्याने काही दिवसांपूर्वीची त्याची जर्नी दाखवली आहे. त्यात त्याने युट्यूब व्हर्सेस टिकटॉक व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला आणि त्याने काही स्क्रीन शॉट्स टाकलेत ज्यात काही तासात जास्त लाईक मिळवलेला भारतीय व्हिडिओ कसा झाला हे दाखवले.

व्हिडिओ डिलिट झाल्यानंतर त्याची झोप उडाली, हातपाय थरथरायला लागले. घाबरलो मी, असे त्याने या व्हिडिओत सांगितले.त्यानंतर त्याचा व्हिडिओ युट्यूबने हटविल्यानंतर त्याचे चाहते त्यावर कसे रिएक्ट झाले, हे ही दाखवले. याशिवाय त्याने शेवटी कॅरी रोस्ट करणार असेही सांगितले.

कॅरी मिनाटी हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा टीझर पाहून चाहते त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. कॅरी मिनाटी काय सांगणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असल्याचे दिसून आले.

 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CarryMinati break silence about Youtube Vs TikTok with his upcoming video TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.