carry minati new song vardaan trending no 1 on youtube | कॅरी मिनाटीचे ‘वरदान’ गाणे रिलीज, युट्यूबवर नंबर 1 वर होतेय ट्रेंड

कॅरी मिनाटीचे ‘वरदान’ गाणे रिलीज, युट्यूबवर नंबर 1 वर होतेय ट्रेंड

ठळक मुद्देनव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर.

गतवर्षी युट्यूबवर धुमाकूळ घालणारा कॅरी मिनाटी अर्थात अजय नागरने पुन्हा एकदा इंटरनेटवर मोठा धमाका केला आहे. कॅरीचे नवे गाणे ‘वरदान’ रिलीज झालेय आणि जबरदस्त हिट झालेय. कॅरीचे हे गाणे युट्यूबवर नंबर1 वर ट्रेंड करतेय.
कॅरी या गाण्यात रॅप करताना दिसतोय. हे संपूर्ण गीत त्याच्या स्वत:च्या आयुष्यावर आधारित आहेत. एका लहान मुलाचे अभ्यासात अजिबात मन रमत नाही. तो आपल्या कुटुंबाला कसा समजवतो आणि युट्यूबच्या दुनियेत कसे पाऊल ठेवतो, हे या गाण्यात दाखवले आहे.

या गाण्याची खास गोष्ट म्हणजे, कॅरी मिनाटीने स्वत: हे गाणे लिहिले आहे. कॅरीचा भाऊ विली फ्रेंजी याने याला म्युझिक दिले आहे. भारतात ‘रोस्ट किंग’ म्हणून ओळखल्या जाणाºया कॅरी मिनाटीचे याआधी ‘यालगार’ हे गाणे रिलीज झाले होते.

लवकरच बॉलिवूडमध्ये होतोय डेब्यू
 
युट्युबर्सचा लाडका कॅरी लवकरच मोठ्या पडद्यावर डेब्यू करताना दिसणार आहे.   महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमातून कॅरीचा डेब्यू होतोय. या सिनेमाचे नाव आहे, ‘Mayday ’. यात अजय देवगण व रकुल प्रीत सिंग लीड रोलमध्ये आहेत. कॅरी मिनाटीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला होता.  

कोण आहे कॅरी मिनाटी?

नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवर CarryMinati व ​​CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़
युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.
अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.
वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: carry minati new song vardaan trending no 1 on youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.