ठळक मुद्दे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणार्‍या हुमाने एक थी डायन, लव शव ते चिकन खुराना , बदलापूर  आणि  जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

गँग ऑफ वासेपूर फेम हुमा कुरेशी हिने कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये धमाकेदार डेब्यू केला. कान्सच्या रेड कार्पेटवरील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर धूम करत आहेत.
हुमाची रेड कार्पेट एन्टी कमालीची धमाकेदार राहिली. सर्वांचे लक्ष वेधण्यात ती यशस्वी ठरली. कान्सच्या रेड कार्पेटवर हुमा ग्रे कलरच्या गाऊनमध्ये दिसली . तिचा हा रफल गाऊन गौरव गुप्ताने डिझाईन केलेला होता. पर्पल ईअररिंग्स, हेअर बन, स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिप शेडमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.


कान्स 2019 च्या पहिल्या दिवशी हुमा ब्लॅक शिमरी ड्रेसमध्ये दिसली होती. या ब्लॅक ड्रेसवरचे गोल्डन बटन ड्रेसला हायलाईट करत होते. त्यापूर्वी ती एका ब्लॅक कलरच्या आॅफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली होती.
 ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणार्‍या हुमाने एक थी डायन, लव शव ते चिकन खुराना , बदलापूर  आणि  जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.   पाहा, हुमाचे कान्समधील काही फोटो...

Web Title: Cannes 2019: Huma Qureshi Is Making a Solid Fashion Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.