ठळक मुद्देमी गरोदर व्हायच्या आधीच ठरवले होते की मी माझ्या बाळाची वॉटर डिलीव्हरी करणार... माझ्या बाळाचा जन्म अतिशय नैसर्गिकपणे आणि कोणत्याही औषधांचा मारा केल्याशिवाय व्हावा असे मला नेहमीच वाटत होते.

ब्रूना अब्दुल्लाने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली होती. तिने तिच्या मुलीचा फोटो पोस्ट करत तिच्या मुलीचे नाव इसाबेल असे ठेवले असल्याचे सगळ्यांना सांगितले होते. आता तिने तिच्या मुलीच्या जन्माच्यावेळेचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ब्रुनाने तिच्या मुलीच्या जन्माच्यावेळेसचा फोटो पोस्ट करत तिच्या मुलीला तिने पाण्यात जन्म दिल्याचे सांगितले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ती, तिचे बाळ आणि तिच्या पतीला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत तिने एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, मी गरोदर व्हायच्या आधीच ठरवले होते की मी माझ्या बाळाची वॉटर डिलीव्हरी करणार... माझ्या बाळाचा जन्म अतिशय नैसर्गिकपणे आणि कोणत्याही औषधांचा मारा केल्याशिवाय व्हावा असे मला नेहमीच वाटत होते. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ही गोष्ट मला पटतच नव्हती. एका अतिशय सुंदर वातावरणात मी माझ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहावी, मला अतिशय प्रिय असणारे लोक माझ्या आजूबाजूला असावेत अशी माझी इच्छा होती. मी गरम पाण्याच्या आत डॉक्टरांच्या मदतीने माझ्या मुलीला जन्म दिला. त्यावेळी माझे पती, आई माझ्यासोबत होते. या दिवसासाठी मी स्वतःला कित्येक दिवसापासून तयार केले होते. मी नियमित व्यायाम करत होते. तसेच योग्य आहार घेत होते. मेडिटेशनदेखील मी न चुकता करत होते. मी माझी डिलिव्हरी व्हायच्याआधी वॉटर डिलिव्हरीबद्दलची खूप सारी माहिती गोळा केली होती. माझ्या बाळाचा जन्म शनिवारी व्हावा आणि लेबर पेन चार तासाहून अधिक नसावेत असे मला सतत वाटत होते. माझ्या इच्छेप्रमाणे कोणत्याही औषधाविना माझ्या बाळाचा जन्म झाला. ती एक जादूच होती. मी इतकी स्ट्राँग आहे याविषयी मला माहीतच नव्हतं. 

ब्रूनाने आय हेट लव्ह स्टोरी, ग्रँड मस्ती या चित्रपटांत काम केले आहे. ब्रूना चित्रपटांशिवाय ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिए 6’ आणि ‘कॉमेडी क्लासेस’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलेली आहे. 2007 मध्ये ‘कॅश’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. अक्षय कुमार व जॉन अब्राहमच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील ‘सुबह होने ना दे’ या सुपरहिट गाण्यातही ती झळकली होती. या गाण्यामुळे ब्रूनाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 

प्रेग्नंसीनंतर ब्रूनाने बॉयफ्रेन्ड एलनसोबत लग्न केले. ब्रूनाचा पती एलन हा स्कॉटिश असून गेल्यावर्षी 25 जुलैला दोघांनी साखरपुडा केला आणि यावर्षी मे महिन्यांत त्यांनी लग्न केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bruna Abdullah Shares 'Magical' Water Birth Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.