ठळक मुद्दे कार्तिक ‘पती पत्नी और वो’च्या शूटींगमध्ये बिझी असताना सारा तिनदा त्याला भेटायला लखनौला गेली होती.

गेल्या काही महिन्यांपासून लिंकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या एका बॉलिवूड कपलच्या ब्रेकअपची बातमी सध्या चर्चेत आहे.  हे कपल कोण तर सारा अली खान आणि कार्तिक आर्यन. गेल्या अनेक महिन्यांपासून सारा व कार्तिक एकमेकांना डेट करत होते. पण आता हे नाते संपुष्टात आले आहे.  ब्रेकअपनंतर साराची काय स्थिती आहे, हे ठाऊक नाही. पण कार्तिकच्या चेह-यावरचे हसू मात्र गायब झाले आहे. होय, रविवारी कार्तिक मुंबईत एका ठिकाणी स्पॉट झाला. यावेळी त्याच्या चेह-यावरचे हसू गायब होते. त्याचा चेहरा कधी नव्हे इतका पडला होता.

फोटोग्राफर्सला पाहिले की, कार्तिक ‘बिग स्माईल’ द्यायचा.  रविवारी तो रेकॉर्डिंग स्टुडिओबाहेर दिसला. पण त्याच्या चेह-यावर जराही हसू नव्हते. पापाराझींनी त्याचे फोटो घेण्याचे प्रयत्न केलेत. पण कार्तिकने नकार दिला. यावेळी कार्तिक व्हाईट हुडी आणि ब्लॅक पॅन्टमध्ये होता.

कार्तिक व साराने प्रोफेशनल कारणाने एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. पण आता या ब्रेकअपमधून सावरणे कार्तिकला तरी जड जातेय.

‘लव्ह आज कल 2’चे शूटींग संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी नाही नाही तो खटाटोप केला. पण बिझी शेड्यूल या दोघांच्या रोमान्सच्या आड येतेय. कार्तिकने ‘पती पत्नी और वो’चे शूटींग पूर्ण केले. यानंतर लगेच तो ‘दोस्ताना 2’मध्ये बिझी झाला. पुढील महिन्यापासून कार्तिक या चित्रपटाचे शूटींग सुुरू करतोय. साराचे म्हणाल तर ती सुद्धा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये बिझी आहेत. अशात आपले रोमॅन्टिक नाते पुढे नेण्यासाठी सारा व कार्तिकला बरेच कष्ट घ्यावे लागत होते.

खरे तर कार्तिक व सारा दोघांनीही आपले नाते कधीच लपवले नाही. कार्तिक ‘पती पत्नी और वो’च्या शूटींगमध्ये बिझी असताना सारा तिनदा त्याला भेटायला लखनौला गेली होती. कार्तिकही साराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बँकॉकला गेला होता. पण वेळेचे गणित मॅच करता करता दोघांच्याही नाकीनऊ आले. इतके की, यानंतर दोघांनीही आपआपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. नात्यापेक्षा या क्षणाला काम महत्त्वाचे आहे, हा त्यामागचा उद्देश होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Break up effect? Kartik Aryan is in no mood to smile for the paps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.