boy rapping and singing like honey singh and badshah in train video goes viral | या 10 वर्षांच्या ‘ज्युनिअर हनी सिंग’चे ढोलकीवरचे रॅप साँग ऐकून व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ
या 10 वर्षांच्या ‘ज्युनिअर हनी सिंग’चे ढोलकीवरचे रॅप साँग ऐकून व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर पुन्हा एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ आहे ट्रेनमध्ये गात पैसे कमावणा-या एका मुलाचा. या 10 वर्षांच्या मुलाने नेटक-यांनाच नाही तर दिग्गज रॅपर यो यो हनी सिंग यालाही  वेड लावले आहे.
  10 वर्षांचा हा मुलगा  व्हिडिओमध्ये आपल्या ढोलकीसह  रॅप गात आहे. इंटरनेटववर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या मुलाला हुबेहुब हनी सिंग आणि बादशाहसारखे रॅप करताना पाहून अनेकजण अवाक् झालेत. हनी तर या मुलाचा फॅन झाला. त्याने स्वत: या मुलाचा व्हिडीओ शेअर करत, त्यांचे   कौतुक केले.

 
रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी असाच व्हायरल झाला होता. यानंतर रानूला बॉलिवूडमधून ऑफर आल्यात. हिमेश रेशमिया याने तर चक्क रानूकडून तीन गाणी गाऊन घेतली. आता रानू एक प्लेबॅक सिंगर झालीय. रानू प्रमाणेच या मुलाचा व्हिडीओही आत्तपर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी तर त्याला ‘ज्युनिअर हनी सिंग’ म्हटले आहे.

Web Title: boy rapping and singing like honey singh and badshah in train video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.