निर्माता बोनी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं प्रस्थ निर्माण केले आहे. आज बोनी कपूर यांचं वाढदिवस आहे. बोनी कपूर यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'हम पाच'पासून केली होती. 1996 साली बोनी कपूर  श्रीदेवी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले होते. 2018 साली श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी बोनी कपूर यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.     


भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या. एक फाईव्ह हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून त्यांच्या मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काका वेणुगोपाल यांनी अनेक खुलासे केले होते.  


वेणुगोपाल रेड्डी यांनी एका तेलगू न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते.. श्रीदेवींच्या आयुष्यात प्रचंड दु:ख होते, असा दावा त्यांनी यावेळी केला. ‘श्रीदेवी सगळ्यांसमोर हसत राहायची. पण आतून ती प्रचंड दु:खात होती. हेच दु:ख आणि अपार वेदना घेऊन ती या जगातून गेली. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांचा बराच मोठा पैसा चित्रपट न चालल्याने डुबला होता.

हा तोटा भरून काढण्यासाठी आणि नवा पैसा उभा करण्यासाठी बोनी कपूर यांनी श्रीदेवीची बरीच प्रॉपर्टी विकली. प्रॉपर्टी विकली गेल्याने आणि आर्थिक स्थिती ठीक नसल्याने श्रीदेवी कायम चिंतीत असायची. श्रीदेवीने दुसºयांदा काम सुरू केले, याचे कारणही बोनी कपूर हेच होते. कुटुंबाला सांभाळण्यासाठीच श्रीदेवींनी दुसरी इनिंग सुरु केली. या चिंतेमुळे मृत्यूनंतरही तिच्या जीवाला शांती मिळू शकणार नाही,’ असे वेणुगोपाल यांनी म्हटले होते.

Web Title: Bonnie kapoor birthday sridevi relative venugopal reddy big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.