दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. श्रीदेवी व बोनी कपूर यांची प्रेमकथा बॉलिवूडमधील चर्चित आहे. बोनी कपूर यांचे आधी एक लग्न झाले असून त्यांना पहिल्या बायकोपासून दोन मुले आहेत. तरीदेखील त्यांचे श्रीदेवीवर प्रेम जडले होते.


एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितले की, श्रीदेवी यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी त्यांना बारा वर्षे लागले होते. बोनी सांगतात की, त्यांनी श्रीदेवी यांना जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिले तेव्हा त्यांच्यावर प्रेम जडले. हे एकतर्फी प्रेम होते. त्यांना फॉलो करत करत बोनी कपूर चेन्नईला पोहचले होते.

त्यांच्यासोबत सिनेमा साईन करायचा होता. पण त्यावेळी श्री उपस्थित नव्हती. मी तिचा आणि तिच्या चित्रपटांचा मोठा चाहता होतो. एक अभिनेत्री म्हणून तिची जी काही इमेज होती, त्याची नेहमी मी स्तुती करत असे. कदाचित हेच कारण होते की मला ती वेड्यासारखी आवडायची. आमची प्रेमकथा एक खुल्या पुस्तकासारखी होती. तिने मला जीवनात प्रत्येक वळणावर साथ दिली, असे बोनी कपूर सांगत होते.


जेव्हा बोनी श्रीदेवी यांना भेटायला चेन्नईला गेले होते. त्यावेळी त्या शूटिंगसाठी सिंगापुरला गेल्या होत्या. त्यानंतर ते नाराज होऊन मुंबईत परतले होते. बोनी कपूर १९८४ साली मिस्टर इंडिया चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन श्रीदेवी यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी श्रीदेवी यांच्या आईने या चित्रपटासाठी १० लाखाचे मानधन मागितले होते. पण बोनी कपूरने ११ लाख रुपये दिले होते. बोनी कपूर बऱ्याचदा बोलले आहेत की त्यांना श्रीदेवी यांच्या नेहमी जवळ राहायचे असायचे. त्यामुळे त्यांनी श्रीदेवी यांना चित्रपटासाठी १ लाख रुपये जास्त दिले होते. 


काही दिवसानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याकडे प्रेम व्यक्त केले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना १९९३ साली प्रपोझ केले. मिस्टर इंडियाच्या सेटवर बोनी स्वतः श्रीदेवी यांना कोणता त्रास तर होत नाही ना याची काळजी घ्यायचे. इतकेच नाही तर त्यावेळी त्यांनी श्रीदेवींसाठी वेगळा मेकअप रुम अरेंज केला होता. त्यानंतर श्रीदेवी बोनी कपूर सोबत कम्फर्टेबल वावरू लागल्या.


यादरम्यान बोनी कपूर यांचे श्रीदेवींवरील प्रेम आणखीन वाढू लागले. जेव्हा श्रीदेवी चाँदनी चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले होते. तिथून परतल्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या पत्नीला श्रीदेवींबद्दल सांगितले. त्यांनी मोनाला सांगितले की, श्रीदेवींवर त्यांचे प्रेम आहे. त्यानंतर मोना खूप दुःखी झाली. ही गोष्ट मोनाने मुलाखतीत सांगितली होती.


मोनाने सांगितले होते की, माझ्यापेक्षा वयाने बोनी दहा वर्षे मोठे होते. जेव्हा माझे लग्न त्यांच्यासोबत झाले तेव्हा मी १९ वर्षांची होती. मी त्यांच्यासोबतच मोठी झाली. आमच्या लग्नाला तेरा वर्ष झाली तेव्हा मला कळले की माझ्या नवऱ्याचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. त्यानंतर आमच्या नात्यात काहीच उरले नाही. आम्ही नात्याला आणखीन एक संधी देऊ शकत नव्हतो कारण त्यावेळी श्रीदेवी प्रेग्नेंट होती.


श्रीदेवी आणि बोनी कपूर २ जून, १९९६ला लग्नबेडीत अडकले. २५ मार्च, २०१२ साली कर्करोगामुळे मोनाचे निधन झाले. मोना व बोनी कपूर यांना दोन मुले आहेत अर्जुन कपूर व अंशुला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर त्यांच्या चारही मुलांची काळजी घेतात. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन व अंशुलाने सावत्र बहिणी जान्हवी व खुशी यांनादेखील आपलेसे केले आहे. यापूर्वी ते एकमेकांशी बोलत नव्हते.  

Web Title: Boney Kapoor and Shri Devi love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.