मोठया पडद्यावर काम करणं काही सोप्पं काम नाही. त्यासाठी अखंड मेहनत, कष्ट उपसावे लागतात. पण, मेहनतीसोबतच काही गोष्टी दैवी देखील असतात. चित्रपट हिट किंवा फ्लॉप होणं हे नशीबाचाही भाग असू शकतो. आता तुम्हाला वाटेल आम्ही हे काय सांगतोय? तर होय, कलाकारांच्या आयुष्यात त्यांचे लकी चार्म ठरलेले असतात. त्या जोडीदारासोबत काम केले की, चित्रपट हिट होतो, असा एक समज त्यांचा असतो. आता बघा ना, आयुषमान खुराणा हा हॉट अ‍ॅण्ड गॉर्जिअस असलेल्या भूमी पेडणेकरला आपली लकी चार्म मानतो. तिच्यासोबत केलेले सिनेमे हिट झाले असून ती त्याच्यासाठी लकी असल्याचे त्याने नुकतेच मान्य केले आहे.  

                   

‘ड्रीमगर्ल’,‘शुभमंगल सावधान’ यासारखे हटके विषयांवरील सिनेमे अभिनेता आयुषमान खुराना याने केलेत. त्याच्या अभिनयातील कौशल्ये त्याने यासर्व चित्रपटातून सिद्ध केलीत. आयुषमान हा बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या त्याचा ‘बाला’ हा चित्रपट तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ७६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमानने आपल्या यशाचे खरे गुपीत उघड केले. त्याने आजवर मिळवलेल्या यशात ‘त्या’ अभिनेत्रीचा सिंहाचा वाटा आहे. ‘ही’ अभिनेत्री त्याच्यासाठी खुप लकी आहे, असे त्याने म्हटले.

भूमी पेडणेकर आयुषमानची लकी अभिनेत्री आहे, असे त्याने म्हटले. दोघांनी आतापर्यंत ‘दम लगा के हइशा’, ‘शुभ मंगल सावधान’ आणि आता ‘बाला’ या तीन चित्रपटात एकत्र काम केले आहे. गंमतीशीर बाब म्हणजे हे तीनही चित्रपट त्याच्या आजवरच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या चित्रपटांमुळे आज आयुष्यमान बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते.

Web Title: Bollywood's 'This' is Hot Actress 'Lucky' for Ayushmann

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.