बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिगदर्शकांपैकी एक म्हणून आपण फराह खानकडे पाहतो. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट दिग्दर्शिका फराह खान एका चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर तिच्या या आगामी चित्रपटामध्ये अभिनेता हृतिका रोशन, दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा ही कलाकार मंडळी झळकणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. परंतु आता या चित्रपटासाठी हृतिक रोशन आणि अनुष्का शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासाठी विशेष फराह खान ही प्रयत्न करतेय.

सूत्रांच्या माहितीनुसार, हृतिक-अनुष्काचा हा आगामी चित्रपट १९८२ च्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी करणार आहेत तर दिग्दर्शन फराह खान करणार आहे. मात्र अद्याप तरी या चित्रपटाचं नाव निश्चित करण्यात आलेलं नाही. या चित्रपटाचं चित्रीकरण २०२० मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून त्यांची घोडदौड अद्याप सुरुच आहे. तर गेल्या वर्षी अनुष्का शर्मा झिरो या चित्रपटामध्ये झळकली होती. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती.

Web Title: Bollywood's 'This' Director is trying to bring Hrithik-Anushka together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.