बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने काही दिवसांपूर्वीच आपला वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. सोहा अली खान सैफ अली खानची लहान बहीण आहे. एक अभिनेत्री म्हणून सोहा अली खान हा चेहरा बी-टाऊनमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र तरही सोहा बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करु शकली नाही. गेल्या बऱ्याच काळापासून सोहा सिनेसृष्टीपासून दूर आहे. केवळ सोहाच नाही तर बॉलिवूडमध्ये अशा अनेक भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत ज्यापैकी बहीण किंवा भावचं करिअर फ्लॉप ठरलं. एक नजर टाकूया अशा भाऊ-बहिणींच्या जोड्यांवर  


शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी
स्लिम फिट फिगर ही शिल्पा शेट्टीची जगभर ओळख आहे. शिल्पा आपल्या करिअरच्या यशाच्या शिखरावर आहे. शाहरुख पासून ते सलमान खानसोबत हिट सिनेमा दिले आहेत. शिल्पाने सगळ्या जास्त हिट सिनेमा दिले आहेत. मात्र शिल्पाची बहीण शमिता शेट्टीचे करिअर पूर्णपणे फ्लॉप झाले.  


आमिर खान आणि फैजल खान  
मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा आमिर खानने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. आमिर खानने त्याच्या करिअरची सुरुवात 1988 साली आलेल्या 'कयामत से कयामत तक' सिनेमातून केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला.  या सिनेमाने आमिर खान रातोरात स्टार झाला. तर आमिरचा भाऊ फैजल सिनेमात आपली काहीच कमाल दाखवू शकला नाही. फैजल गेल्या अनेक महिन्यांपासून लाईमलाईटपासून दूर आहे.  


सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर
 सोनम कपूरने रणबीर कपूरसोबत सावरियाँ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमाने एका मागोमग एक अनेक हिट सिनेमा दिला. मात्र तिचा भाऊ हर्षवर्धन अजूनही हीट सिनेमाच्या शोधात आहे. हर्षवर्धन आतापर्यंत दोन सिनेमा दिले आहेत. 2018मध्ये आलेल्या भावेश जोशीमध्ये तो सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला होता मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.      ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना
 ब्लॉकबस्टर सिनेमा बरसातमधून ट्विंकलने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ट्विंकलच्या वाटेल अनेक चांगले सिनेमा आले. मात्र ट्विंकलची लहान बहीण रिंकी खन्नाला लोकांनी नाकारले. रिंकीचे अनेक सिनेमा फ्लॉप ठरले. सध्या रिंकी लाईमलाईटपासून दूर आपलं आयुष्य जगत आहे. 

 


Web Title: Bollywood flop brothers and sisters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.