-रवींद्र मोरे
वादविवाद आणि चित्रपटसृष्टी दरम्यान जणू एक नातेच बनले आहे. प्रत्येकवर्षी बरेच चित्रपट रिलीज होतात आणि कोणता ना कोणता चित्रपट वादात अडकतोच. कधी कथानक तर कधी चित्रपटाच्या नावावरुन अनेक प्रश्न तयार होतात. कधी कधी तर स्टार्सच्या वक्तव्यावरुनही वाद होतो. आयुष्मान खुराणाचा ‘आर्टिकल 15’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटदेखील वादात सापडला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. आज अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांच्याबाबत अगोदर खूपच वाद झाला, मात्र त्यांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडले.

* कबीर सिंह


शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ कोटीचे कलेक्शन केले. या चित्रपटाला रिलीज होऊन काहीच दिवस झाले आणि आतापर्यंत १२० कोटी पेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. हा चित्रपट देखील वादात सापडला होता. काही लोक या चित्रपटास महिला विरोधी म्हणत आहेत. एवढेच नव्हे तर मुंबईच्या काही डॉक्टर्सने कबीर सिंह चित्रपटाच्या मेकर्सच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की, या चित्रपटात मेडिकल प्रोफेशनला चुकीच्या पद्धतीने दर्शविले आहे.

* भारत


सलमान खानचा ‘भारत’ रिलीज होण्याच्या चार दिवस अगोदरच वादात सापडला होता. ‘भारत’ चित्रपटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत चित्रपटाच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. याचिकेत म्हटले होते की, चित्रपटाचे नाव भारतीय संविधानच्या अनुच्छेद ३ चे उल्लंघन करत आहे. या अनुच्छेद नुसार कोणत्याही देशाचे प्रतीक चिन्ह आणि नावाचा वापर कोणत्याही कमर्शियल उद्देशासाठी केला जाऊ शकत नाही. सलमानच्या या चित्रपटाने तरीही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४२.३० कोटीचे कलेक्शन केले असून २०० कोटीचा आकडा पार केला आहे.


* पद्मावत


हा चित्रपट तर बऱ्याच वादात सापडला होता. विशेष म्हणजे चित्रपटाच्या नावावरुन खूपच मोठा वाद झाला होता. तसे या चित्रपटाचे नाव बदलवण्यात आले. त्यानंतरदेखील चित्रपटाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. दीपिका पादुकोणला तर तिचे नाक कापण्यापर्यंतची धमकी मिळाली होती. बºयाच राज्यात हा चित्रपट बॅन राहिला, मात्र रिलीज नंतर चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धमालच केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच १८ कोटीची कमाई केली तर एकुण कलेक्शन सुमारे ५८५ कोटी केले.

* गोलियों की रासलीला : रामलीला
बाजीराव मस्तानीच्या अगोदर भंसालीने दीपिका आणि रणवीर सोबत ‘रामलीला’ चित्रपट बनविला होता. याचे नाव जाहिर होताच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नाव बदलून 'गोलियों की रासलीला-रामलीला' ठेवावे लागले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १२.८० कोटीचा बिझनेस केला होता. तर एकूण ३५६ कोटीचे कलेक्शन होते.

* पीके


आमिर खानचा चित्रपट ‘पीके’ २०१४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटावरुनही खूप वाद झाला होता. हिंदू संघटनांनी आरोप लावला होता की, या चित्रपटात हिंदू धर्म आणि देवदेवतांचा अपमान करण्यात आला आहे. शिवाय चित्रपट बॅन करण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. या वादा नंतरही चित्रपटाने धमाकेदार एन्ट्री केली होती. पहिल्याच दिवशी २६.६३ कोटीचे कलेक्शन केले होते.


Web Title: bollywood-controversial-films-which-become-superhit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.