this Bollywood actor who will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हा बॉलिवूड अभिनेता, जाणून घ्या याबद्दल

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हा बॉलिवूड अभिनेता, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या यशाच्या शिखरावर आहे. कबीर सिंग चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. कबीर सिंग चित्रपटानंतर त्याने जर्सीच्या रिमेकसाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. जर्सीचा रिमेक २०२१च्या दिवाळीत भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो सामान्य कुटुंबातील क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

जर्सी चित्रपटाचे काम आटोपल्यानंतर आता शाहिद कपूर राज अँड डीकेची आगामी सीरिजच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. या सीरिजमधून तो डिजिटल माध्यमात पदार्पण करतो आहे. या सीरिजच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार शाहिद कपूरने कबीर सिंगचे निर्माते अश्विन वर्देसोबत एका बिग बजेट चित्रपटावर चर्चा केली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत आहे.


चित्रपटाशी निगडीत सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला बातचीतमध्ये सांगितले की, अश्विन वर्देने साउथच्या मोठ्या प्रोडक्शन हाउस लाइक प्रोडक्शन्ससोबत हात मिळवणी केली आहे. जो बॉलिवूडमध्ये बरेच बिग बजेट चित्रपट बनवणार आहे. अश्विन वर्देने या डील अंतर्गत बनणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत चित्रपटासाठी शाहिद कपूरसोबत बातचीत केली आहे. 


बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार शाहिद कपूरला चित्रपटाची आइडिया आवडली आहे आणि त्याने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. शाहिद कपूरने दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या पद्मावत चित्रपटातून ऐतिहासिकपटात पाऊल टाकले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत चित्रपट त्याच्या करिअरमधील दुसरा ऐतिहासिक चित्रपट असेल. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: this Bollywood actor who will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.