बॉलिवूडचा हा अभिनेता म्हणतो मागच्या जन्मी होतो बिहारी, दोन मुलांचा आहे सिंगल बाप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:00+5:30

बॉलिवूडचा हा अभिनेता आहे दोन मुलांचा सिंगल फादर

Bollywood actor Hritik Roshan said he was Bihari in rebirth, He is father of two child | बॉलिवूडचा हा अभिनेता म्हणतो मागच्या जन्मी होतो बिहारी, दोन मुलांचा आहे सिंगल बाप

बॉलिवूडचा हा अभिनेता म्हणतो मागच्या जन्मी होतो बिहारी, दोन मुलांचा आहे सिंगल बाप

googlenewsNext


बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गतवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली. त्याआधी दीर्घकाळ हृतिक रूपेरी पडद्यापासून दूर होता. ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सिनेमांच्या यशानंतर हृतिकचे नाव काही मोठ्या प्रोजेक्टसोबत जोडले जात आहे. अर्थात अद्याप यापैकी कुठल्याही प्रोजेक्टची अधिकृत घोषणा झालेली नाही. नुकतेच हृतिकने उदयपुरमध्ये एका इव्हेंटसाठी हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने वॉर व सुपर ३० चित्रपटाबद्दल सांगितले. 

हृतिक रोशन म्हणाला की, "वॉर आणि सुपर ३० या सिनेमातील दोन्ही भूमिका कठीण होत्या. कबीर आणि आनंद या दोघांचे मन एकच आहे. यातील कोणाला एकाला बघून आपलं मत बनवू नका. मी बघितलं आहे की माणसे एकसारखी असतात मात्र त्यांच्या वागण्यावरून ती वेगळी ठरतात."


मी एक माणूस आहे जो आपल्या विचारांवर काम करून स्वतःला बदलतो. मी भूमिकांना पारखून घेतो. आपल्या दोन्ही भूमिकांविषयी मत मांडताना हृतिक म्हणाला, खरं सांगायचं तर सुपर 30 त्यामानाने सोपा होता. मागच्या जन्मी मी कदाचित बिहारी असेन.

ऋतिक रोशनने सुपर 30 मधील गणितज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेने सर्वांना हलवून टाकले होते. त्यानंतर, चाहत्यांनी वॉरमधील कबीरच्या भूमिकेचेही खूप कौतुक केले होते, सुपर 30 मधील गणितज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेहुन 'वॉर'मधील कबीरची भूमिका वेगळी होती. 


ऋतिक ने 2019 मध्ये दोन बैक टू बैक हिट दिले होते आणि वॉर सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे. २०१९ मध्ये आपल्या दमदार अभिनय आणि परफॉर्मेंससोबत ऋतिकचा बोलबाला बघायला मिळाला होता ज्यात 300 करोड़ क्लबमध्ये प्रवेश करत त्याने सर्व रेकॉर्ड तोडले होते.

Web Title: Bollywood actor Hritik Roshan said he was Bihari in rebirth, He is father of two child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.